आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साक्षी मलिकने पैलवान सत्यव्रतसोबत केला साखरपुडा, कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिल्व्हर विजेता आहे सत्यव्रत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक - रिओ ऑलिंपिकमध्ये ब्राँझ मेडल जिंकून इतिहास रचणारी रेसलर साक्षी मलिकने आपल्यापेक्षा एक वर्षाच्या लहान रेसलर सत्यव्रतसोबत रविवारी साखरपुडा केला. साक्षीने अंत्यत साधेपणाने आपल्या काही खास मित्र आणि नातेवाईकांसमवेत साखरपुडा केला. दोघे अनेक वर्षापासून एकमेकांना ओळखतात. सत्यव्रतने कॉमनवेल्थ गेम्समध्ये देशाला सिल्व्हर मेडल मिळवून दिले आहे.

एकत्रच तालीम करतात साक्षी आणि सत्यव्रत...
- 24 वर्षाची साक्षी मलिकने 23 वर्षाच्या सत्यव्रतसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
- सत्यव्रत कादियान रोहतकमध्ये तालीम चालवणारे पैलवान सत्यवान यांचा मुलगा आहे. तो 97 किलो वजनी गटात खेळतो.
- पैलवान सत्यवान हेच सत्यव्रत आणि साक्षी यांचे गुरु आहेत. सत्यवान यांना अर्जुन अवॉर्ड मिळाला आहे.
- नुकताच गुरगावमध्ये आयोजित केलेल्या भारत केसरी लढतीत सत्यव्रत तिस-या स्थानावर राहिला होता.
- याशिवाय सत्यव्रतने भारत केसरी आणि चंबळ केसरी यासारखे किताब आपल्या नावावर केले आहेत.
- तर, साक्षीने रिओ ऑलिंपिकमध्ये 12 व्या दिवसी भारताचे मेडल खाते खोलले होते.
- ती महिला कुस्तीत भारताला ब्राँझ मेडल जिंकून देणारी पहिली खेळाडू ठरली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा इतर काही खास फोटो...
बातम्या आणखी आहेत...