आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#Rio : मल्‍ल योगेश्वर दत्त पराभूत, भारताचे रिओ ऑलिम्पिकमधले आव्‍हान संपुष्‍टात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साक्षी मलिकच्या कामगिरीने आत्मविश्वास द्विगुणित झालेला योगेश्वर दत्त रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत आज (रविवारी) पुरुषांच्या 65 किलो वजन गटाच्या कुस्तीत मंगोलियाच्या पहिलवानाकडून 0-3 गुणांच्‍या फरकाने पराभूत झाला. त्‍यामुळे त्‍याचे ऑलिम्पिकमधले आव्‍हान संपुष्‍टात
कांस्‍य पदकाची होती आशा ...
> योगेश्वरने आपल्‍या पहिल्‍याच राउंडमध्‍ये निराशाजनक प्रदर्शन केले. त्‍यामुळे त्‍याला 0-3 ने पराभव स्‍वीकाराला लागला.
> त्‍याने पहिल्‍या फेरीत एक तर दुसऱ्या फेरीत दोन अंक स्‍पर्धक पहिलवानाला दिले.
> जर मंगोलियाचा पहिलवान अंतिम सामन्‍यासाठी पात्र ठरला असता तर योगेश्वरला कांस्‍य पदकासाठी खेळण्‍याची संधी मिळाली असती.
> रिओमध्‍ये भारताला पहिले पदक मिळवून देणारी साक्षीसुद्धा याच पद्धतीने जिंकली होती.
> याला रेपेचेज राउंड असे म्‍हटले जाते. 2008 मध्‍ये सुशील कुमार आणि 2012 स्‍वत: योगेश्वर दत्तनेही रेपेचेज राउंडमध्‍येच कांस्‍य पदक जिंकले होते.
आई म्‍हणाली, 'तू देशासाठी सुवर्णपदक घेऊन ये. मी तुझ्यासाठी मुलगी पसंत केलीय'
दरम्‍यान, योगेश्‍वरची आई सुशीलादेवी म्‍हणाल्‍या, ' बाळा, तू देशासाठी सुवर्णपदक घेऊन ये. मी तुझ्यासाठी मुलगी पसंत केली आहे.
यापूर्वी मिळवून दिले होते कांस्‍य
योगेश्वर दत्त यापूर्वीही तीन वेळा ऑलिम्‍पिक खेळलेला आहे. त्‍याने 2012 मध्‍ये लंडन ऑॅलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले आहे. आताही त्याच्याकडून पदकाची आशा केली जात होती. त्यामुळे त्याच्यावर देशवासीयांची खास नजर होती. सोमवारी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेचा समारोप होणार आहे. गत ऑगस्टपासून ब्राझीलमध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली. यात भारताला दोन पदके जिकंता आली.

हरियाणा सरकार रिओ विजयी खेळाडूंना देणार बक्षीस
> खेळाडूंना प्रोत्‍साहन देण्‍याच्‍या उद्देशाने हरियाणाचे मुख्‍यमंत्री मनोहर लाल यांनी पी. व्‍ही सिंधू, जिम्नास्ट दीपा कर्माकर, धावपट्टू ललिता बाबर यांना रोख रक्‍कमेच्‍या बक्षिसाची घोषणा केली आहे.
> त्‍या अंतर्गत सिंधूला 50 लाख, ललिता-दीपाला 15-15 लाख रुपये मिळणार आहेत. शिवाय रोहतकची मल्‍ल साक्षी मलिकच्‍या कोचला 10 लाख रुपये दिले जाणार आहेत.
> हरियाणा सरकार साक्षीला 2.5 कोटी रु. देणार आहे.
> तसेच दिल्ली सरकारने साक्षीला एक कोटी तर सिंधूला दोन कोटी रुपयांचे बक्षीस देण्‍याची घोषणा केली.
> सिंधूला आतापर्यंत 10 कोटींपेक्षा अधिक तर साक्षीला 6 कोटींपेक्षा जास्‍त बक्षीस घोषित झाले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कुस्तीच्या पुरुष गटात निराशजनक कामगिरी
बातम्या आणखी आहेत...