स्पोर्ट्स डेस्क- शतकातील सर्वात महागडी फाईट जिंकलेल्या बॉक्सर फ्लॉयड मेवेदरने आपल्या स्टाईलमध्ये पार्टी केली. मेवेदर रात्री उशिरा आपल्याच स्ट्रिप क्लबमध्ये पोहचला. येथे येताच सेंटर ऑफ अट्रेक्शन राहिली त्याची 26 कोटींची कार बुगाती वेरॉन. जगातील सर्वात महागडी कार घेऊन मेवेदर आपल्या स्ट्रिप क्लब 'गर्ल्स कलेक्शन'मध्ये पोहचताच फॅन्स हैराण झाले. आपल्याला माहित असेलच की, मेवेदरची फाईटसाठी सुमारे 3832 कोटी (600 मिलियन डॉलर) सट्टा लागला होता. स्ट्रिप क्लबमध्ये करतो पार्टीज...
- 4000 कोटींची संपत्ती असणा-या मेवेदरने काही दिवसापूर्वी एक एडल्ट स्ट्रिप क्लब खोलला आहे. जेथे तो स्ट्रिप पार्टीज करतो. आताही आपल्या विजयाचा जल्लोष तेथेच त्याने साजरा केला.
लढत पाहायला पोहचले 20 हजार प्रेक्षक-
- बॉक्सिंगची ही हायप्रोफाईल लढत लास वेगासमधील टी मोबाईल एरीनात खेळली गेली. स्टेडियमबाबत बोलायचे झाल्यास 20,000 प्रेक्षक क्षमतेचे हे टी मोबाईल एरीना स्टेडियम गच्च भरले होते. या लढतीसाठी 100 डॉलर ते 250 डॉलर (सुमारे 6400 रुपये ते 16 हजार रूपये) एवढी एका तिकीटाची किंमत होती.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रत्येक राउंडमध्ये दिसत असलेल्या या रिंग गर्ल्सला सुद्धा लाखो डॉलर्स देण्यात आले.
चार हजार कोटींचा लागला सट्टा-
- फाईटच्या प्रमोटर्सचे म्हणणे आहे की, या फाईटसाठी मेवेदरवर 600 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 3832 कोटी रुपयेंचा सट्टा लावला होता.
- एमएमए अल्टीमेट फायटिंग चॅम्पियनशिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाना वाईट यांच्या माहितीनुसार, ' हे पहिल्यांदाच घडले की एखाद्या फाईटवर इतक्या मोठ्या रक्कमेचा सट्टा लागला.
पुढे स्लाई़द्वारे पाहा, मेवेदरच्या 26 कोटींच्या कारचे फोटोज....