आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रामदेव बाबांनी \'नकली फायटर\' म्‍हटल्‍यावर भडकला खली, म्‍हणाला- आळशीच करतात योगा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - द ग्रेट खलीने रामदेव बाबा यांच्‍यावर जुन्‍या वक्‍तव्‍यावरून निशाणा साधला आहे. रामदेव बाबा यांनी ‘द ग्रेट खली रिटर्न्स’ला नकली फायटर म्‍हटले होते. तेव्‍हा खली म्‍हणाला, केवळ आळशी आणि वृद्ध लोकच योगा करतात. जे लोक शक्‍तीशाली असतात ते माझ्याप्रमाणे कुस्‍ती खेळतात. कपालभातीने मेडल नाही मिळत..
- एका टीव्‍हीच्‍या कार्यक्रमात बाबा रामदेव यांच्‍या वक्‍तव्‍यावर खलीची प्रतिक्रीया घेण्‍यात आली.
- खली म्‍हणाला, “कपालभातीने ऑलिम्‍पिकमध्‍ये पदक मिळाले असते तर, प्रत्‍येकाने घेतले असते.”
कुस्तीपटू कृष्णकुमारने उपस्‍थित केला प्रश्‍न..
- काही दिवसांपूर्वी ‘द ग्रेट खली रिटर्न्स’बाबत कुस्‍तीपटू कुष्‍णकुमार यानेही खलीला चॅलेंज दिले होते.
- त्‍यावेळी खली कुमारला म्‍हणाला होता, “जे लोक फाइटला नकली म्‍हणतात, त्‍यांनी एकवेळा रिंगमध्‍ये उतरून पहावे, असली-नकलीचा फरक लक्षात येईल.”
- कुमार म्‍हणाला होता, “नकली फाइट बंद व्‍हावी. मी खलीसोबत फाइट खेळायला तयार आहे.”
कूस्‍तीच्‍या वेळी खली झाला होता जखमी..
- काही दिवसांपूर्वी खली कॅनडाच्‍या कुस्‍तीपटूसोबत खेळताना जखमी झाला होता.
- उत्तराखंडमध्‍ये झालेल्‍या या कुस्‍तीच्‍या वेळी कॅनडाच्‍या कुस्‍तीपटूने खलीला खुर्ची मारली होती.
- खलीला हॉस्पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले होते.
- खली ठीक झाल्‍यानंतर त्‍याने तीन विदेशी कुस्‍तीपटूंना हरवले होते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, खलीला अशी मारली होती खुर्ची......त्यानंतर खली गेला होता कोमात....