मियामी- वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन जॉन सीनाच्या जीवावर तेंव्हा बेतले, जेव्हा WWE च्या एका रॉ इव्हेंटमध्ये प्रतिस्पर्धी असलेल्या एका पहेलवानाने एकानंतर एक
किक मारत त्याचे नाक फोडले. रिंगमध्येच जॉन सीनाचा चेहरा रक्त बंबाळ झाला होता. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा सेठ रॉलिंस याने फाइट सुरूच ठेऊत त्याच्या फुटलेल्या नाकावरच अनेकदा पंच मारले. एवढे होऊनही अखेल ही फाइट जॉन सीनानेच जिंकली.
फाइट सुरू असतानाच रक्तही सांडत होते
फाइट सुरू होऊन 10 मिनिटेही झाले नव्हते तोच सेठ रॉलिंस याने जॉन सीनाच्या तोंडवर एक जबरस्त किक मारली. या किक नंतर तर असे वाटले होते की जॉन सीना आता उठणारच नाही. तो रिंगमध्येच चीत झाला होता. मात्र सेठ रॉलिंसच्या विजयाच्या कॉलवर रेफरी तीन म्हणण्याच्या आतच जॉन सीना उठून उभार रहिला. येथे जॉनएवजी दुसरा कुणी असता, तर कदाचित तो जागचा उठूचशकला नसता. मात्र उभाराहिल्यानंतर नाकातून रक्त वाहत असतानाही, जॉन सीना एखाद्या चवताळलेल्या वाघासारखा रॉलिंसवर तुटून पडला.
रॉलिंसची जोरदार धुलाई
सीनाचे नाक फुटल्यामुळे रेफरीची फाइट थाबवण्याची इच्छा होती, पण सीनाने असे होऊदिले नाही. त्याने 'आय अॅम ओके' म्हणत फाइट सुरूच ठेवली. सीनाने रॉलिंसची धुलाई करायला सुरूवात केल्या नंतर मात्र रॉलिंसची हाडे खिळखिळी झाली. थोड्याच वेळात फइटचे चित्रच पालटले. रॉलिंस रिंगमध्ये चीत झाला आणि सीना किताबासह विजयोत्सव सेलिब्रेट करू लागला. फाइट संपताच डॉक्टर तेथे आले आणि त्यांनी सीनावर उपचार केले.
या आधीही झाली होती दूखापत
जॉन सीनाला रिंगमध्ये दुखापत होण्याची ही पहिली वेळे नाही. या आधीही त्याला अनेकदा दुखापत झालेली आहे. या आधी फाइटच्या दरम्यान त्याचे हात आणि पाय दोन्हीही फ्रॅक्चर झाले होते. एकदा तर, एका फाइटदरम्यान त्याच्या मानेलाही दुखापत झाली होती. तेव्हा तर फार कमी लोकांना त्याच्या पुनरागमनाची शक्यता वाटत होती
पुढील स्लाइड्सवर पाहा, फाइटचा रोमांच, रक्त बंबाळ झला असतानाही कशी केली जॉन सीनाने फाइट, सेठ रॉलिंसला चीत करूनच झाला शांत.