आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • WWE Wrestler Undertaker Was In Love With Women Wrestler Sable

चॅम्पियन ब्रॉक लेसनरच्या पत्नीवर लट्टू होता अंडरटेकर, केले होते किडनॅप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WWE चा (वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट) नेक्स्ट इव्हेंट रंगात आला आहे. पण काही अशा वुमन रेसलर आहेत ज्यांना फॅन्स यावेळी बघू शकणार नाहीत. त्यात सर्वांत महत्त्वाची आहे माजी रेसलर आणि सुपर मॉडेल सॅबल. या निमित्त आम्ही तुम्हाला सॅबलची माहिती देणार आहोत. प्रोफेशन मॉडेलिंगमधून ती WWE मध्ये आली होती. ब्रॉक लेसनरशी लग्न करणाऱ्या सॅबलची एन्ट्र्रीही धमाकेदार झाली होती. WWE चे सर्वच रेसलर तिच्यावर फिदा होते. त्यात अत्यंत क्रूर फायटर अंडरटेकरचाही समावेश होता. त्याला सॅबलसोबत लग्न करायचे होते. यासाठी त्याने एकदा तिला किडनॅपही केले होते.
बघायचा होता डान्स, किडनॅप करुन केले प्रपोज
एकदा अंडरटेकर रिंगमध्ये आला तेव्हा प्रेक्षक शांत झाले. रिंगमधील सॅबल आणि स्टेफनी मॅकमहोन तर आश्चर्यचकित झाल्या. त्याने सॅबलला डान्स करण्यास सांगितले. यावेळी स्टेफनी रिंग सोडून पळून गेली. त्यानंतर त्याने दोन्ही महिला पैलवानांना किडनॅप केले. त्याने दोघींनाही लग्नाची मागणी घातली. पण दोघींनीही प्रस्ताव धुडकावून लावला. स्टेफनीचे वडील विन्सी मॅकमहोन आणि भावाने समजवल्यानंतर दोघी अंडरटेकरच्या ताब्यातून सुटल्या.
तीन वेळा राहिली प्लेबॉयच्या कव्हर पेजवर
सॅबलला प्लेबॉय मॅगझिनने तीन वेळा कव्हर पेजवर स्थान दिले आहे. यासाठी मॅगझिनने तिला मोठी रक्कम दिली होती. 1999 मध्ये सॅबल कव्हर पेजवर असलेले मॅगझिन सर्वाधिक विकले गेले होते. सॅबलने 6 मे 2006 रोजी ब्रॉक लेसनरशी लग्न केले. त्यानंतर तिचे नाव रेना मॉर्नेट लेसनर झाले. दोघांना टर्क आणि ड्यूक अशी दोन मुले आहेत.
दोन वेळा झाली एंगेजमेंट, त्यानंतर लग्न
2004 मध्ये मार्कपासून घटस्फोट घेतल्यानंतर सॅबल ब्रॉक लेसनरला डेट करीत होती. दोघांची 2005 मध्ये एंगेजमेंट झाली. त्यानंतर विन्सीचे नाव समोर आले. दोघे दुरावले. त्यानंतर पुन्हा दोघांनी एंगेजमेंट केली. 6 मे 2014 रोजी लग्न केले.
पुढील स्लाईडवर बघा, सॅबल-ब्रॉक लेसनर यांचे काही निवडक फोटो...