आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Yao Ming, China\'s Basketball Superstar Latest News In Hindi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'day: करोडो रुपयांचा धनी आहे हा चीनी स्टार, वाचा या \'लंबू\'ची LOVE स्टोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह यावो मिंग. दुसऱ्या फोटोत त्याची वाइफ ये ली. - Divya Marathi
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह यावो मिंग. दुसऱ्या फोटोत त्याची वाइफ ये ली.
जगातील स्वर्वाधिक उंची असलेल्या खेळाडूंपैकी एक असलेला चीनचा माजी बास्केटबॉलपटू यावो मिंग. याची पर्सनल लाइफ एखाद्या सिनेमापेक्षा नक्कीच कमी नाही. 17 वर्षांचा असतांना त्याची मिंगची महिला बास्केटबॉलपटू ये ली हिच्याशी पहिली भेट झाली. आधी त्यांची मैत्री झाली, नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. या लव्ह स्टोरीचा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा मिंग आणि ये ली यांनी ओलिम्पिक-2004 च्या पुरस्कार समारंभात एक-मेकांची स्तुती करून अफेअर असल्याचे सांगीतले. तेव्हा हे दोघेही 24 वर्षांचे होते.
12 सप्टेंबर, 1980 ला जन्मलेल्या मिंगची विक्रमी आठ वेळा (2003, 2004, 2005, 2006, 2007, 2008, 2009 आणि 2011) एनबीए (नेशनल बास्केटबॉल असोसिएशन) ऑल स्टार म्हणून निवड करण्यात आली आहे. यावोची एकूण संपत्ति साधारणपणे तीन अब्ज रुपये एवढी आहे.
ऑगस्ट, 2007 मध्ये झाले लग्न
7 फुट 6 इंच एवढी उंची असलेल्या यावोने आपल्या प्रेम कहानीचा खुलासा करताना सांगितले होते की, अम्ही पहिल्यांदा 17 वर्षांचे असतानाच (1998 मध्ये) एका समारंभात भेटलो होतो. पहिल्या भेटीत अम्ही एकमेकांना ओळखू शकलो नाही. मात्र टुर्नामेंटच्यावेळी सोबत राहिल्यानंतर कळले की अम्ही एक-मेकांसाठीच जन्माला आलो आहोत. यावो मिंग आणि ये ली यांनी 6 ऑगस्ट, 2007 रोजी लग्न केले. त्यांना याओ क्लिनेई नावाची एक मुलगी असून तिचा जन्म 21 मे, 2010 रोजी झाला. ये लीची उंची मिंगपेक्षा फार कमी असून ती 6 फूट 3 इंच आहे.
पुरस्कार
- विक्रमी आठ वेळा एनबीए ऑल स्टार
- पाच वेळा ऑल एनबीए टीम (2007, 2009, 2004, 2006, 2008)
- एनबीए ऑल रॉकी फर्स्ट टीम-2003
- एनबीए ऑल रॉकी ऑल स्टार टीम-2004
- आशियन चॅम्पियनशिप-2001, 2003, 2005 (चीन)
- ऑल टुर्नामेंट टीम-2002
- रूकी ऑफ द ईयर-2003
- लॉरेंस न्यू कमर ऑफ द ईयर-2003

पुढील स्लाइड्सवर पाहा, यावो मिंग आणि ये ली यांचे काही निवडक फोटो...