आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता योगेश्वर दत्तकडून कुस्तीत पदकाच्या आशा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअाे दी जनेरियो - साक्षी मलिकच्या कामगिरीने अात्मविश्वास द्विगुणित झालेला याेगेश्वर दत्त रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेत सरस कामगिरीसाठी उत्सुक अाहे. ताे रविवारी पुरुषांच्या ६५ किलाे वजन गटाच्या कुस्तीत भारताचे प्रतिनिधित्व करणार अाहे. अाता त्याच्यावर स्पर्धेतील भारतीय संघाचा शेवट पदकाने गाेड करण्याची मदार असेल. त्याने २०१२ लंडन अाॅलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले अाहे. अाताही त्याच्याकडून पदकाची अाशा केली जाते. त्यामुळे त्याच्यावर देशवासीयांची खास नजर असेल. साेमवारी रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेचा समाराेप हाेणार अाहे. गत ५ अाॅगस्टपासून ब्राझीलमध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली. यात भारताला दाेन पदके जिकंता अाली.

कुस्तीच्या पुरुष गटात भारताला अपेक्षित अशी कामगिरी करता अाली नाही. संदीप ताेमर अाणि हरदीपला समाधानकारक कामगिरी करता अाली नाही. परिणामी, त्यांना सलामीलाच चीतपट व्हावे लागले. तसेच माेठे अाशास्थान असलेल्या नरसिंगला डाेपिंगमुळे चीतपट व्हावे लागले. त्यामुळे त्यालाही कुस्तीत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. भारतीय संघात चैतन्याचे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी अाता याेगेश्वरवर असेल.
बातम्या आणखी आहेत...