आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगेश्वर दत्तला नाही मिळणार सुवर्ण; डोपिंगमध्ये अडकला नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कुस्तीपटू योगेश्वर दत्तचे लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक सुवर्णपदकात बदलणार नाही. जागतिक कुस्ती संघटनेने (यूडब्ल्यूडब्ल्यू) मंगळवारी स्पष्ट करताना सांगितले की, लंडनमधील ६० किलो वजन गटातील सुवर्णपदक विजेता मल्ल तोग्रुल असगारोवने कसलेच बंदी असलेले औषध घेतलेले नाही. तो मुळीच कलंकित नाही. त्याची प्रतिमा स्वच्छ आहे. तो कधीही डोपिंगमध्ये अडकला नसल्याचे संघटनेने सांगितले.
जागतिक कुस्ती संघटनेने िट्वटरवरून ही माहिती दिली. ‘ज्या बातम्या आल्या त्या चुकीच्या आहेत. २०१२ चा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता तोग्रुल असगारोवने कधीच यूडब्ल्यूडब्ल्यूचे डोपिंगबाबतचे कायदे मोडले नाहीत.’ याआधी असगारोव डोपिंग चाचणीत अडकल्याचे वृत्त झळकले होते. यामुळे योगेश्वरचे कांस्यपदक आता सुवर्णपदकात बदलेल, अशीही चर्चा झाली.
योगीला रौप्य शक्य
याआधी६० किलो वजन गटातील रौप्यपदक विजेता रशियाचा मल्ल बेसिक कुदुखोव डोपिंग चाचणीत फेल झाला होता. यामुळे चार वेळेसचा ऑलिम्पिक पदक विजेता मल्ल कुदुखोवचे हे पदक जाण्याची शक्यता असून हे पदक भारताचा कांस्यपदक विजेता योगेश्वरला मिळू शकते.
बातम्या आणखी आहेत...