आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योकोविक पाचव्यांदा चॅम्पियन! एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स राॅजर फेडररचा पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - वर्ल्ड नंबर वन सर्बियाच्या नोवाक योकोविकने फायनलमध्ये रॉजर फेडररला पराभूत करून सलग चौथ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स टेनिसचे विजेतेपद पटकावले. २८ वर्षीय योकोविकने सामना ६-३, ६-४ ने जिंकला. सामन्याचा निकाल ८० मिनिटांत लागला. ४६ वर्षांच्या इतिहासात सलग चौथ्यांदा विजेतेपद जिंकणारा योकोविक पहिला टेनिस स्टार आहे. योकोविकने पहिल्यांदा २००८ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. २०१२ पासून तो सलग विजेता आहे.

या विजयासह योकोविक आणि फेडरर यांच्यात जय-पराजयाचा रेकॉर्ड २२-२२ असा झाला. योकोविकने फेडररचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. पहिला सेट ६-३ असा जिंकण्यासाठी योकोविकला खास मेहनत घ्यावी लागली नाही. सामन्यात फेडररने ३१ साध्या चुका केल्या. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंत संघर्ष रंगला. सेटमध्ये ३-४ ने मागे पडल्यानंतर फेडररने सलग पाच गुण मिळवत पुनरागमनाचे प्रयत्न केले. मात्र, योकोने सेटसह सामना जिंकला.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, वर्षभरात जिंकले ११ किताब..