आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US Open: नदालला लुकासचा दे धक्का; सानिया, रोहन बोपन्ना पराभूत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- फ्रान्सचा युवा प्रतिभावंत खेळाडू लुकास पोईलने दमदार खेळ करून १४ ग्रँडस्लॅम विजेता स्पेनचा दिग्गज खेळाडू राफेल नदालला अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत पराभूत केले. यासह नदाल एकेरीतून बाहेर झाला. याशिवाय भारताची जगातील दुहेरीतील नंबर वन खेळाडू सानिया, राेहन बाेपन्नाचाही मिश्र दुहेरीत पराभव झाला.

रविवारी नदालला ऑर्थर अॅश स्टेडियमवर फ्रान्सचा २२ वर्षीय जगात २५ व्या क्रमांकावर असलेल्या लुकास पोईलेने पाच सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात ६-१, २-६, ६-४, ३-६, ७-६ (८-६) ने हरवले. लुकासने हा सामना चार तास आणि सात मिनिटांत जिंकला. या विजयासह अमेरिकन ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारा लुकास पोईले तिसरा फ्रेंच खेळाडू ठरला. त्याच्याशिवाय जो. विल्फ्रेड सोंगा अणि गाएल मोंफिल्स यांनीसुद्धा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. १९४७ नंतर प्रथमच युएस ओपनमध्ये फ्रान्सच्या तीन खेळाडूंनी क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला.

महिलाएकेरीचे सामने : महिलाएकेरीत दुसरी मानांकित अँजोलिक कर्बरने जर्मनीच्या पेट्रा क्वितोवला ६-३, ७-५ ने पराभूत करताना क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. माजी नंबर वन खेळाडू कॅरोलिन वोज्नियाकी अनास्तासिया सेवास्तोवाना आगेकूच केली. वोज्नियाकीने मेडिसन किजला ६-३, ६-४ ने हरवले, तर सेवात्सावाने कोंटावर ६-४, ७-५ ने मात केली.
बाेपन्नापराभूत : भारताचाराेहन बाेपन्ना मिश्र दुहेरीत दाब्राेवास्कीसाेबत पराभूत झाला. त्यांना राॅबर्ट फराह लीनाने १-६, ६-२, १०-८ ने हरवले.
योकोविक चौथ्या फेरीत
नंबर वन सर्बियाचा खेळाडू नोवाक योकोविकने शानदार खेळ करताना चौथी फेरी गाठली. पुरुष एकेरीत योकोविकने इंग्लंडच्या २१ वर्षीय काइल एडमंडला सरळ सेटमध्ये ६-२, ६-१, ६-४ ने हरवले.

सानिया मिर्झाचाही पराभव
सानिया मिर्झाला मिश्र दुहेरीत पराभवाचा सामना करावा लागला. सानिया मिर्झा आणि इवान डोडिगच्या जोडीला बिगर मानांकित बारबोरा क्रोज्सिकोवा आणि मरिन द्रगंजा यांनी ६-१, ६-४ ने हरवले.

माझ्या चुकांमुळेच मी हरलो....
> मी चांगला खेळ केला. मी विजयाच्या समीपही होतो. मात्र, मी पुन्हा चुका केल्या. मी फोरहँड आणि शॉट मिस केले. यामुळे माझे नुकसान झाले. या चुकांनी मी सामना गमावला. विरोधी खेळाडूने उत्तम खेळ करताना मला विजयापासून रोखले. लुकासचे अभिनंदन.
-राफेल नदाल, पराभवानंतर
बातम्या आणखी आहेत...