आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकाेल्याच्या अर्चनाने जिंकलेले सुवर्णपदक काही तासांत गमावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्चनाने धावपटू निमाली काेंडा हिला (डावीकडील) ढकलले. - Divya Marathi
अर्चनाने धावपटू निमाली काेंडा हिला (डावीकडील) ढकलले.
भुवनेश्वर - महाराष्ट्राची युवा धावपटू अर्चना अढाव ही रविवारी २२ व्या एशियन अॅथलेटिक्स चॅम्पिनयशिप अाैटघटकेची चॅम्पियन ठरली. तिने महिलांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अव्वल स्थान गाठले. मात्र, त्यानंतर श्रीलंकेच्या राैप्यपदक विजेत्या निमेलीनेे अापल्याला धावताना अर्चनाने धक्का दिल्याचा अाराेप केला. त्यामुळे पंचांनी भारताच्या अर्चनाला अपात्र ठरवण्याचा निर्णय दिला. त्यामुळे तिचे सुवर्णचे स्वप्न भंगले.
 
पदक तालिकेत भारत अव्वल स्थानावर : यजमान भारतीय संघाने २२ व्या एशियन अॅथलेटिक्स चॅम्पिनयशिपमधील अापला दबदबा कायम ठेवला. भारत सर्वाधिक २९ पदकांसह  अव्वल स्थानावर अाहे. यामध्ये एकूण १२ सुवर्ण, ५ राैप्य अाणि १२ कांस्यपदकांचा समावेश अाहे. यासह भारताने एेतिहासिक कामगिरीची नाेंद केली. यजमान भारताचे अव्वल धावपटू अापल्या घरच्या मैदानावर वरचढ ठरत पदकांची कमाई करत अाहेत. भारताने तिसऱ्या दिवशी रविवारी पाच पदकांची कमाई केली. यामध्ये पाच सुवर्णांसह एक राैप्य अाणि तीन कांस्यपदकांचा समावेश अाहे.   
बातम्या आणखी आहेत...