आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राे कबड्डी लीग : पुणेरी पलटण विजयी; मुंबाची पाटणावर मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू/पुणे - यू मुंबा टीमने दुसऱ्या सत्राच्या प्राे कबड्डी लीगमध्ये ११ व्या विजयाची नाेंद केली. मुंबाने पाटणा पायरेट्सचा ३२-२७ ने पराभव केला. यासह मुंबाने गुणतालिकेतील अापले अव्वलस्थान अधिक मजबूत केले. या टीमच्या नावे १२ सामन्यांत ११ विजय अाणि एका पराभवासह एकूण ५५ गुण झाले अाहेत. दुसरीकडे पुणेरी पलटण टीम घरच्या मैदानावर सामना जिंकून विजयी ट्रॅकवर अाली अाहे. या टीमने रविवारी दिल्लीला ३३-२८ ने हरवले. पुण्याचा हा दुसरा विजय ठरला.
वाॅरियर्सकडून जयपूर पराभूत : बंगाल वाॅरियर्स टीमने रविवारी गतविजेत्या जयपूर पिंक पॅथर्सचा पराभव केला. या टीमने रंगतदार लढतीत ३९-३८ ने विजय मिळवला. जयपूरचा हा पाचवा पराभव ठरला. पुण्यासमाेर अाज मुंबा पराभवातून सावरलेल्या पुणेरी पलटण टीमला अापल्या घरच्या मैदानावर साेमवारी यू मुंबाच्या तगड्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल. घरच्या मैदानावर विजय मिळवण्याचा यजमानांचा प्रयत्न असेल.