आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युकी भांबरी उपांत्यपूर्व फेरीत दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ह्युस्टन (अमेरिका) - दुखापतीमधून सावरलेल्या युवा खेळाडू युकी भांबरीने शुक्रवारी अायटीएफ फ्युचर्स अाेपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्याने पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत यजमान अमेरिकेच्या गाेंजालेस अास्टिनला घरच्या मैदानावर धूळ चारली. त्याने ६-०, ७-५ अशा फरकाने राेमहर्षक विजय संपादन केला.
यासह त्याला एकेरीच्या अंतिम अाठमधील अापला प्रवेश निश्चित करता अाला. अाता जागतिक क्रमवारीत २८३ व्या स्थानावर असलेल्या युकी भांबरीचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना पाचव्या मानांकित सेबेस्टियन फान्सेलाेशी हाेईल.
गत सहा महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर टेनिस काेर्टवर पुनरागमन करताना युकी भांबरीने दमदार सुरुवात केली. त्याने पहिल्या सेटमध्ये सहज बाजी मारली. दरम्यान, त्याने अमेरिकेच्या खेळाडूची तीन वेळा सर्व्हिस ब्रेक केली. यासह त्याला लढतीमध्ये अाघाडी मिळाली. त्यानंतर त्याने दुसऱ्या सेटमध्येही अापली अाक्रमता कायम ठेवली. मात्र, अास्टिनने पुनरागगमन करताना त्याला झंुजवले.
अखेर, सरस खेळीच्या बळावर युकीने टायब्रेकरपर्यंत खेचला गेलेला दुसरा सेट जिंकून सामना अापल्या नावे केला. अाता अापली लय कायम ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. यासाठी त्याने कंबर कसली. किताबावर नाव काेरण्याचा त्याचा मानस अाहे.
बातम्या आणखी आहेत...