आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युकीचा राेमहर्षक विजय; भारतीय संघाची बराेबरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ख्राइस्टचर्च- युवा खेळाडू युकी भांबरीने शानदार विजयासह भारतीय संघाला शुक्रवारी डेव्हिस चषक अाशिया अाेशियाना ग्रुप-१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १-१ ने बराेबरी मिळवून दिली. यासह यजमान न्यूझीलंडचा लढतीत अाघाडी घेण्याचा प्रयत्न हाणून पडला.
पुरुष एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात जागतिक क्रमवारीत १५१ व्या स्थानावर असलेल्या युकी भांबरीने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. त्याने दुसऱ्या सामन्यात यजमान संघाच्या जाेस स्टॅथमचा पराभव केला. युकीने ६-२, ६-१, ६-३ अशा फरकाने सामन्यात विजय संपादन केला. यासह त्याने भारतीय संघाला १-१ ने बराेबरी मिळवून दिली. यासाठी त्याला तीन सेटपर्यंत जागतिक क्रमवारीत ३५४ व्या स्थानावर असलेल्या जाेसने झुंजवले. मात्र, सरस खेळी करून त्याने विजयश्री खेचून अाणली. दमदार सुरुवात करताना युकीने पहिल्या सेटमध्ये शर्थीची झुंज देत बाजी मारली. त्यानंतर त्याने दुसरा सेटही सहज जिंकून लढतीमध्ये अाघाडी घेतली. त्यानंतर हीच लय तिसऱ्या सेटमध्येही कायम ठेवत त्याने सामना अापल्या नावे केला. यासह त्याला यजमान टीमचा अाघाडीचा प्रयत्न हाणून पाडता अाला.

साेमूची झुंज अपयशी

अमेरिकन चॅलेंजरचा चॅम्पियन साेमदेव देववर्मनने दिलेली झुंज अपयशी ठरली. त्याला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. जागतिक क्रमवारीत ५४८ व्या स्थानावर असलेल्या मायकेलने भारताच्या खेळाडूला पराभूत केले. त्याने ४-६, ४-६, ६-३, ६-३, ६१ ने विजयाची नाेंद केली.
बाेपन्नाचा अाज सामना
भारताच्या राेहन बाेपन्ना अाणि साकेत मिनेनीचा पुरुष दुहेरीचा सामना शनिवारी यजमानांच्या मार्क डॅनियल-अार्टम सिताकशी हाेईल. या सामन्यातील विजयासह भारताला अाघाडी घेण्याची संधी अाहे.
बातम्या आणखी आहेत...