Home »Sports »Other Sports» Yusuf Pathan Strike Rate Greater Than Chris Gayle

युसूफ सर्वोच्च स्ट्राइक रेटमध्ये गेलच्या पुढे ..!

वृत्तसंस्था | Apr 21, 2017, 03:00 AM IST

  • युसूफ सर्वोच्च स्ट्राइक रेटमध्ये गेलच्या पुढे ..!
नवी दिल्ली - आयपीएलमध्ये वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज क्रिस गेल नेहमी चर्चेत असताे. नुकताच त्याने टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा गाठला. या सत्रात क्रिस गेलने अद्याप एकही शतक ठोकलेले नाही. मात्र, स्पर्धेत सर्वाधिक ५ शतके ठोकण्याचा विक्रम गेलच्याच नावे आहे.
आयपीएलमध्ये एक असाही विक्रम अाहे, ज्यात केकेआरच्या युसूफ पठाणने गेलला मागे टाकले असून, गेल युसूफ आणि मिलरनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. हा विक्रम तुफानी फलंदाजीशी संबंधित आहे.

तुफानी फलंदाजी करण्यात गेलप्रमाणे युसूफ पठाणसुद्धा जगभरातील दिग्गज खेळाडूंत सामील आहे. आयपीएलमध्ये सर्वोच्च स्ट्राइक रेटसह शतक ठोकण्याचा विक्रम युसूफ पठाणच्या नावे असून, यात गेल त्याच्या मागे तिसऱ्या क्रमांकावर आहे.
युसूफने आयपीएलमध्ये १३ मार्च २०१० रोजी राजस्थान रॉयल्सकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध अवघ्या ३७ चेंडूंत शतक ठोकले होते. युसूफने या शतकामध्ये ८ गगनभेदी षटकार आणि ९ चौकार मारले होते. या खेळीदरम्यान युसूफचा स्ट्राइक रेट २७०.२७ असा सर्वोच्च होता. आयपीएलमध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेटसह शतकाच्या विक्रमात युसूफनंतर द. आफ्रिकेचा डेव्हिड मिलरचा समावेश आहे. मिलरने ६ मे २०१३ रोजी किंग्ज इलेव्हन पंजाबकडून बंगळुरूविरुद्ध ३८ चेंडूंत १०१ धावा काढल्या होत्या. यात त्याचा स्ट्राइक रेट २६५.७८ असा होता. यात त्याने ८ चौकार, ७ षटकार मारले होते.

गेल तिसऱ्या स्थानी
या यादीत गेल तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पुणे वॉरियर्सविरुद्ध २३ एप्रिल २०१३ रोजी ६६ चेंडूंत १३ चौकार आणि १७ षटकारांच्या मदतीने १७५ धावा काढल्या होत्या. यात त्याचा स्ट्राइक रेट २६५.१५ असा होता. द. आफ्रिकेचा ए.बी.डिव्हिलर्स या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. पाचव्या क्रमांकावर सनथ जयसूर्या, सहाव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट आहे.

Next Article

Recommended