आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवेंट्स चॅम्पियन्स लीगच्या फायनलमध्ये; सहाव्यांदा फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टुरिन (इटली)- युवेंट्सने सहाव्यांदा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. युवेंट्सने मोनाकोला सेमीफायनलच्या दुसऱ्या लेगमध्ये २-१ ने हरवले. युवेंट्सने एकूण ४-१ ने विजय मिळवून तीन सत्रांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पहिल्या लेगमध्ये युवेंट्सने मोनाकोला २-० ने हरवले होते. युवेंट्स ३ जून रोजी कार्डिफ येथे होणाऱ्या फायनलमध्ये रिअल माद्रिद आण अॅटलेटिका माद्रिद यांच्यातील विजेत्याशी लढेल. रिअल माद्रिदने पहिल्या लेगचा सामना ३-० ने जिंकला होता.   

युवेंट्सकडून मारियो मेंडजुकिचने ३३ व्या, डेनी एल्वेसने ४४ व्या मिनिटाला गोल केले, तर मोनाकोकडून किलियन बाप्पेने ६९ व्या मिनिटाला गोल केला. बाप्पेचा हा गोल मोनाकोकडून सत्रातील १५० वा गोल ठरला. या सत्रात पाच मोठ्या युरोपियन लीगमध्ये रिअल माद्रिद  (१५८ गोल) आणि बार्सिलोना (१६० गोल) हे मोनाकोपेक्षा गोल करण्यात पुढे आहेत. बाप्पे चॅम्पियन्स लीगच्या सेमीत गोल करणारा सर्वांत युवा (१८ दिवस, १४० िदवस) खेळाडू ठरला.

युवेंट्सने केली मिलानची बरोबरी
युवेंट्स सर्वाधिक ६ वेळा चॅम्पियन्स लीगच्या फायनलमध्ये पोहोचणारी दुसरी टीम आहे. युवेंट्सने एसी मिलानच्या विक्रमाची बरोबरी केली. असे असले तरीही युवेंट्सच्या नावे सर्वाधिक ४ वेळा चॅम्पियन्स लीग फायनलमध्ये पराभव आहेत. या सत्रात चॅम्पियन्स लीगमध्ये युवेंट्स सध्या अजेय आहे. 
बातम्या आणखी आहेत...