मुंबई:क्रिकेटर्स आणि फिल्म स्टार्स यांच्या रोमांसची चर्चा कही नवी नाही. विराट कोहली-अनुष्का शर्मा, ज़हीर खान-ईशा शरवानी, हरभजन सिंग-गीता बसरा आणि आता यांच्यानंतर नंबर लागतोय तो, युवराज सिंह आणि हेजल कीच यांचा. हेजल कीच अॅक्टर सलमान खानबरोबर सुपरहिट फिल्म 'बॉडीगार्ड' मध्ये दिसली होती. या सिनेमात तीने करीना कपूरच्या मैत्रिणीचा रोल साकराला होता.
सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, गेल्या काही दिवसांपासून युवी हेजलच्या प्रेमात पडला आहे. ते एक-मेकाना डेटही करत आहेत. मात्र, ही गोष्ट सध्या सीक्रेटच असावी अशी त्यांची इच्छा आहे. माहितीतर अशीही आहे की, हे दोघे एका सीक्रेट व्हॅकेशवर लंडनला गेले होते. लंडनची सैर करून ते नुकतेच परतले आहेत. दोघेही एक-मेकांच्या बाबतीत सीरिअस असल्याचेही बोलले जाते. अपेक्षा आहे की, हे दोघे लवकरच या नात्याचा स्विकार करून पुढे वाटचाल करतील.
ब्रिटिश मॉडेल आणि अॅक्ट्रेस हेजलने अपल्या करिअरची सुरूवात 2007 मध्ये फिल्म 'बिल्ला' ने केली होती. यानंतर ती 2011 मध्ये रिलीज झालेल्या सलमान-करीनाच्या फिल्म 'बॉडीगार्ड' मध्येही दिसून आली. ती फिल्म 'मैक्सिमम' मध्ये आयटम गर्ल झाली होती. 'बिग बॉस-7'मध्येही तिने भाग घेतला होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा, ब्रिटिश मॉडेल आणि अॅक्ट्रेस हेजल कीचचे काही फोटो...