आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यजमान झिम्बाब्वेचा न्यूझीलंडला दणका; न्यूझीलंड ७ विकेटने पराभूत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरारे - यजमान झिम्बाब्वेने रविवारी अत्यंत रोमांचक वनडे सामन्यात न्यूझीलंडला ७ विकेटने हरवले. पाहुण्या न्यूझीलंडने त्यांना ३०४ धावांचे कठीण लक्ष्य दिले होते. मात्र, झिम्बाब्वेने अवघ्या ३ विकेटच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. झिम्बाब्वेच्या विजयाचा हीरो क्रेग इर्विन (१३०*) ठरला. त्याने अवघ्या १०८ चेंडूंत ही खेळी केली. तोच "मॅन आॅफ द मॅच' ठरला. यासह झिम्बाब्वेने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. सुरुवातीला न्यूझीलंडने रॉस टेलरच्या (११२*) शतकाच्या बळावर ४ बाद ३०३ धावा ठोकल्या होत्या. किवी संघाने एकवेळ ३९ धावांत २ विकेट गमावल्या होत्या. यानंतर टेलरने केन विलियम्सनसोबत (९७) तिसऱ्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी केली.
बातम्या आणखी आहेत...