आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्जेंटिनाने पटकावला पहिल्यांदा डेव्हिस चषक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झाग्रेब - चार वेळच्या उपविजेत्या अर्जेंटिना संघाने पहिल्यांदा डेव्हिस चषकाचा बहुमान पटकावला. या संघाने फायनलमध्ये गत चॅम्पियन क्राेएशियाला पराभूत केले. अर्जेंटिना संघाने ३-२ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह अर्जेंटिनाला चषकावर नाव काेरता अाले. अातापर्यंत या संघाला चार वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले हाेते. मात्र, यंदाच्या सत्रात अर्जेंटिनाने विजेतेपद अापल्या नावे केले. डेव्हिस चषक पटकावणारा अर्जेंटिना हा १५ वा देश ठरला.

दुसऱ्यांदा चॅम्पियन हाेण्याच्या इराद्याने मैदानावर उतरलेल्या क्राेएशियाच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. त्यामुळे या संघाला लढतीत बराेबरी साधता अाली.
फेडरिकाेचा निर्णायक विजय
फेडरिकाे डेलबाेनिस हा अर्जेंटिनाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने पुरुष एकेरीच्या निर्णायक सामन्यात क्राेएशियाच्या अनुभवी इवाे कालरेविचला पराभूत केले. त्याने ६-३, ६-४, ६-२ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याने अर्जेंटिनाचा किताब निश्चित केला.
बातम्या आणखी आहेत...