आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याेकाेविककडे सिंगापूरचे नेतृत्व दुसर्‍या सत्राची अायपीटीएल स्पर्धा: कार्लाेस माेया संघात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापूर- येत्या २ डिसेंबरपासून दुसऱ्या सत्राच्या इंटरनॅशनल प्रीमियर टेनिस लीगला (अायपीटीएल) सुरुवात हाेणार अाहे. जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविक या दुसऱ्या सत्रामध्ये सिंगापूर स्लेमर्स संघाचे नेतृत्व करणार अाहे. विम्बल्डन चॅम्पियन याेकाेविकच्या नेतृत्वाखाली साेनेरी यश मिळवण्यासाठी सिंगापूरचा संघ उत्सुक अाहे. ही लीग २ ते २० डिसेंबरदरम्यान रंगणार अाहे.

‘पहिल्या सत्रातील यशाने अामचा अात्मविश्वास द्विगुणित झाला अाहे. अाता हीच यशाची लय दुसऱ्या सत्रातही कायम ठेवण्याचा अामचा प्रयत्न असेल. अाशियाच्या बाहेर हाेणाऱ्या या लीगला माेठी प्रसिद्धी मिळाली अाहे,’ अशी प्रतिक्रिया अायपीटीएलचा संस्थापक अाणि संचालक महेश भूपतीने दिली.

टीममध्ये कार्लाेस माेया, स्विसची बेलिंडा बेनसिस,कॅराेलिना,मार्सेलाे मेलाे व निकचा समावेश अाहे.

२ डिसेंबरला जपानमध्ये प्रारंभ
जपान येथे २ डिसेंबर राेजी दुसऱ्या सत्राच्या अायपीटीएलला सुरुवात हाेईल. तसेच समाराेपीय सामन्यांचा थरार सिंगापूरच्या मैदानावर रंगणार अाहे. या लीगमध्ये पाच फ्रँचायझींचे संघ सहभागी झाले. यात सिंगापूर स्लेमर्ससह जपान वाॅरियर्स, इंडियन एसेस, फिलिपाइन्स मॅवरिक्स, यूएई राॅयल्सचा समावेश अाहे.