आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Novak Yokovika Wimbledon Champion, Paes Hingisala For Mixed Doubles

नोवाक योकोविक विम्बल्डन चॅम्पियन, पेस-हिंगीसला मिश्र दुहेरीचे विजेतेपद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योकोविक ट्रॉफीला चुमतांना - Divya Marathi
योकोविक ट्रॉफीला चुमतांना
लंडन - मिश्र दुहेरीचे अाठवे ग्रॅण्डस्लॅम : पेसचेहे करिअरमध्ये मिश्र दुहेरीचे आठवे ग्रँडस्लॅम ठरले. यात सर्वाधिक चार वेळा विम्बल्डन अजिंक्यपदाचा समावेश अाहे. मिश्र दुहेरीत त्याने २००३, २०१०, २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन तर २००८ मध्ये अमेरिकन ओपनचे ग्रँडस्लॅम जिंकले होते.

भारताच्या४२ वर्षीय लिएंडर पेसने रविवारी स्वीसच्या मार्टिना हिंगीससाेबत विम्बल्डन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. हे त्याचे १६ वे ग्रँडस्लॅम ठरले. पेसने चाैथ्यांदा या स्पर्धेची फायनल जिंकली. पेस अाणि मार्टिनाने फायनलमध्ये पाचव्या मानांकित अलेक्झेंडर पेया अाणि टिमेया बाबाेसवर ४० मिनिटांत ६-१, ६-१ ने विजय मिळवला. मार्टिना हिंगीसच्या साथीने भारताला सलग दोन दिवसांत दोन ग्रँडस्लॅम मिळाले. भारतीय स्टार लिएंडर पेसच्या नावे मिश्र दुहेरीचे आणि पुरुष दुहेरीचे ग्रँडस्लॅम झाले आहेत.

पेस अाणि हिंगीसने एेस अाणि विनर्स मारून १९ मिनिटांमध्ये पहिला सेट जिंकून अाघाडी मिळवली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये सातव्या मानांकित जाेडीने २१ मिनिटांत विनर्स मारुन बाजी मारली. पेस-हिंगीस जाेडीने सुरुवातीपासून जबरदस्त आक्रमक खेळ करीत विरोधी खेळाडूना त्रस्त करून सोडले. जबरदस्त बॅकहँड, नेट जवळून आक्रमक फटके खेळून या दोघांनी गुणांची कमाई केली.

हिंगिसलादुहेरी मुकुट : स्वीसच्या३४ वर्षीय मार्टिना हिंगिसने यंदा विम्बल्डन टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळवला. तिने महिला दुहेरीत सानिया मिर्झासोबत शनिवारी विजेतेपद जिंकले होते.

चौथेविजेतेपद : पेसनेविम्बल्डन मिश्र दुहेरीत चौथ्यांदा ग्रँडस्लॅम जिंकले. त्याने १९९९, २००३, २०१० बाजी मारली होती.

लविम्बल्डनमध्येरविवारी पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये नोवाक योकोविकने जबरदस्त खेळ करून मैदान जिंकले. फायनलमध्ये त्याने रॉजर फेडररला चार सेटमध्ये ७-६ (७-१), ६-७ (१०-१२), ६-४, ६-३ ने हरवले.

योकोिवकने ही लढत दोन तास आणि ५६ मिनिटांत जिंकली. पहिला सेट गमावल्यानंतर फेडररने दुसरा सेट जिंकून सामन्यात पुनरागमन केले. मात्र, योकोविकने पुढचे दोन्ही सेट जिंकून सामन्यावर आपले नाव कोरले. दोन्ही महान खेळाडूंना चाहत्यांनी जोरदार पाठिंबा दिला. सामन्यात योकोविकने १३, तर फेडररने १४ ऐस मारले. मात्र, योकोविकच्या च्या तुलनेत फेडररने डबल फॉल्ट केले.

तिसऱ्यांदाविजेता
योकोविकने तिसऱ्यांदा विम्बल्डन जिंकले. त्याचे हे नववे ग्रँडस्लॅम ठरले. त्याच्या नावे ऑस्ट्रेलियन आणि एक अमेरिकन ओपनचे विजेतेपद आहे. २०१५ मध्ये योकोने दोन ग्रँडस्लॅम पटकावले आहे.