आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Fans Says Well Don Sania Bhabhi On Becoming Wimbledon Champion

PHOTOS- पाकमधील चाहते म्‍हणतात, ‘वेल डन सानिया भाभी’, सचिन-विराटनेही केले कौतूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताची स्‍टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीससह विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विम्बल्डन स्‍पर्धेच्‍या महिला दुहेरीचे जेतेपद पटकावणारी सानिया पहिलीच भारतीय ठरली आहे. सानियाच्‍या या कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत आहे. राष्‍ट्रपती, प्रधानमंत्र्यांसह देशबांधवांनी तिचे अभिनंदन केले आहे.
मुलींना जिंकण्‍याची प्रेरणा मिळेल - सानिया
विम्‍बल्‍डन स्‍पर्धेच्‍या या यशातून देशातील मुलींना जिंकण्‍याची प्रेरणा मिळेल अशी आशा सानियाने व्‍यक्‍त केली. सामन्‍यानंतर ती म्‍हणाली की, 'आपण जिंकण्‍यासाठीच खेळत असतो आणि मला खेळणे व जिंकणे या दोनच बाबी आवडत आल्‍या आहेत. या यशातून मूलींनी आपल्‍या ध्‍येयासाठी प्रेरणा घ्‍यावी.'
सानियाच्‍या पाकिस्‍तानातील चाहत्‍यांचे काही ट्विट्स
* सानिया भाभीने तर मनाला जिंकल. - जुनैद रिजवी
* सानिया भाभीने विम्‍बल्‍डन, शोएब भाईने पाकिस्‍तानला जिंकल. दोघांसाठीही किती आनंदाचा दिवस असेल हा. - सरीम रशीद
* भाभी सानियाचे विम्‍बल्‍डन जिंकल्‍याबद्दल अभिनंदन. - मीर
* सानिया मिर्झा कश्‍मीर बनल्‍यासारखी वाटते. जिला दोन्‍ही प्राप्‍त आपले मानतात. - अंकुर सिंह
सचिन, विराटनेही केले कौतूक
सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनीही सानिया मिर्झाचे अभिनंदन केले आहे.
सचिन पत्‍नी अंजलीसोबत, तर विराट गर्लफ्रेंड अनुष्‍का शर्मा हिच्‍यासोबत विम्‍बल्‍डन पाहण्‍यासाठी होते. सचिन म्‍हणाला , ‘सानिया आणि हिंगिस, आपले अभिनंदन, आपल्‍या कामगिरीमुळे देशाचा गौरव होत आहे.’ विराटनेही सानिया आणि मार्टिना यांना शुभेच्‍छा देऊन त्‍यांच्‍या खेळाचे कौतूक केले.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, सानियाचे अभिनंदन करणा-या सेलेब्‍सचे काही ट्विट्स..