आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेमदेवने जिंकला एटीपी किताब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र
विन्नेटका- भारताचास्टार युवा खेळाडू साेमदेव देववर्मन एटीपी निल्सन प्राे टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरला. त्याने या स्पर्धेत पुरुष एकेरीचा किताब पटकावला. त्याने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या डॅनियल न्युएगनचा पराभव केला. भारताच्या साेमदेवने रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या फायनलमध्ये ७-५, ४-६, ७-६ अशा फरकाने राेमहर्षक विजय मिळवला. त्याने अापल्या नावे पाचव्या एटीपी किताबाची नाेंद केली.
सत्राच्या सुरुवातीपासून मिळत असलेल्या पराभवाची मालिका खंडित करून साेमदेवने साेनेरी यश संपादन केले. याशिवाय त्याने टेनिसमध्ये दमदार पुनरागमन केले. दुसऱ्या सेटमधील अपयशातून सावरलेल्या साेमदेवने तिसऱ्या सेटमध्ये शर्थीची झुंज दिली.

तिसऱ्या दिवशी भारताला चाैथा किताब
टेनिसच्याविश्वातील भारतीय खेळाडूंच्या दबदबा सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिला. भारताचा एकेरीचा अव्वल खेळाडू साेमदेवने अमेरिकेतील स्पर्धेत पुरुष एकेरीचा किताब पटकावला. याशिवाय दाेन दिवसांपूर्वी सानिया मिर्झा, लिएंडर पेस अाणि सुमीत नागलने विम्बल्डन स्पर्धा गाजवून अजिंक्यपदावर नाव काेरले.