आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HBD : शोएब नव्हे तर हा होता सानियाचा पहिला पती, अगोदरच झाले होते लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सानिया मिर्झा - Divya Marathi
सानिया मिर्झा

स्पोर्ट्स डेस्क - भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा 15 नोव्हेंबरला 31 वर्षांची झाली आहे. सानियाने ऑस्ट्रेलियाच्या एका रेस्टॉरंटमध्ये झालेल्या भेटीनंतर 12 एप्रिल 2010 मध्ये पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिकसोबत लग्न केले. शोएब मलिकची पत्नी होण्यापूर्वी सानिया मिर्झाने दुसऱ्यासोबतच लग्न केलेले होते. हा व्यक्ती दुसरा कोणी नसून तिचाच बालपणीचा मित्र शोराब मिर्झा हे होते. दोन्ही कुटूंबियांच्या संमतीने लग्नही 2009 मध्ये झाले होते. शोराबच्या कुटूंबियांच्या ताणतनावामुळे दोन्ही कुटूंबात दरी निर्माण झाली होती. शोराबचे वडील आदिल मिर्झा यांना सानियाने टेनिस खेळणे रूचले नव्हते.

 

शोराबशी लग्न केल्यानंतर सानिया ऑस्टेलियन ओपन खेळण्यास ऑस्ट्रेलियाला गेली हेाती. यादरम्यान सानियाची भेट शोएब मलिक याच्याशी झाली. दोघांच्या प्रेमाचे रुपांतर लग्नातही झाले. त्यामुळे सानियाने शोराबला सोडचिठ्ठी देऊन शोएबशी संसार सुरु केला.

 

पुढील स्लाईडवर पाहा - शोराब आणि सानिया मिर्झाचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...