आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दुहेरीचे ग्रँडस्लॅम किताब जिकणारी पहिली भारतीय बनली सानिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सानिया आणि मार्टिना हिंगीस - Divya Marathi
सानिया आणि मार्टिना हिंगीस
नवी दिल्ली - भारताचीनंबर वन टेनिसपटू सानिया मिर्झाने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचे ग्रँडस्लॅम जिंकताच पाकिस्तानच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. सानिया भाभीच्या नावे बरेच टयुटर करताना चाहते म्हणाले, "खूपच शानदार खेळली सानिया भाभी.' एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवाझ शरीफ यांच्या भेटीने दोन्ही देशांतील चर्चेला पुन्हा सुरुवात झाली, तर दुसरीकडे सानियाच्या विजयाने दोन्ही देशांतील चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली.

सचिन, विराटकडूनही कौतुक
सचिनतेंडुलकर आणि विराट कोहली यांनीसुद्धा सानियाच्या या विजयाचे कौतुक केले आहे. सचिन पत्नी अंजलीसोबत, तर विराट गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासह लंडनला विम्बल्डन पाहण्यासाठी पोहोचलेले आहेत. पहिल्यांदा विम्बल्डन चॅम्पियन बनलेल्या सानियाचे कौतुक करताना सचिन म्हणाला, "सानिया आणि हिंगीस, तुम्हा दोघींचे अभिनंदन. स्पर्धेत तुम्ही खूपच शानदार खेळ केला. जीवनात तुम्हाला असे अनेक किताब मिळो. सानियाने या कामगिरीने देशाला गौरवान्वित केले आहे.' विराटनेसुद्धा सानियाचे अभिनंदन करताना म्हटले, "गर्ल पॉवर. सानिया आणि मार्टिना हिंगीस तुम्हा दोघींचे खूप खूप अभिनंदन. पहिल्या सेटनंतर शानदार पुनरागमन केले. चॅम्पियन्स विम्बल्डन २०१५.'
सानियाचे देशभर अभिनंदन
राष्ट्रपतीप्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील चाहत्यांनी विम्बल्डनचा किताब जिंकल्यामुळे सानियाचे अभिनंदन केले. "सानिया खूप शानदार खेळली. सानिया-हिंगीसला या विजयाच्या शुभेच्छा,' असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
सानियाच्या शानदार विजयाने दोन्ही देशांतील चाहत्यांना जल्लोष करण्याची मिळाली संधी
बातम्या आणखी आहेत...