आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS - सेरेना विल्यम्स विंबल्‍डनची राणी, ग्रॅंड स्लॅमचे 21वे विजेतेपद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजेतेपद पटकावल्‍यानंतर विंबल्‍डन ट्रॉफीसोबत सेरेना. - Divya Marathi
विजेतेपद पटकावल्‍यानंतर विंबल्‍डन ट्रॉफीसोबत सेरेना.
अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्सने सहाव्‍यांदा विंबल्डनमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. शेवटच्‍या सामन्यामध्‍ये तिने स्पेनच्या गार्बीन मुगुरुझा हिचे आव्हान 6-4, 6-4 असे दोन सेटमध्ये परतावून लावले आहे. याबरोबरच सेरेनाच्या खात्यात चारही ग्रॅंड स्लॅम
विजेतिपदे जमा झाली. कारकिर्दीतील तिचा हा दुसरा पराक्रम आहे.
सेरेनाच्‍या करियरमधील हे विंबल्डनचे सहावे, तर 21 वे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद आहे. 20 वे मानांकन असलेली मुगुरुझा कारकिर्दीत प्रथमच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्‍या अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. सुरूवातीला सेरेनावर दडपण जाणवत होते. पहिल्याच गेममध्ये तिने सर्व्हिस गमावली.
तिच्याकडून तीन डबलफॉल्ट झाल्या. चार ब्रेकपॉइंटलाही ती सामोरे गेली. मात्र तिने सुधारणा करत लवकरच खेळ उंचावला व सहाव्या गेममध्ये मुगुरुझाला दोन ब्रेकपॉइंट वाचविण्यास भाग पाडले. सेरेनाने दुसऱ्या सेटमध्ये नवव्या गेममध्ये सर्व्हिस गमावली, लगेच पुन्हा ब्रेक मिळवत तिने विजेतेपदावर नाव कोरले.
सेरेनाचे ग्रॅंड स्लॅम रेकॉर्ड
विंबल्डन - 2002, 2003, 2009, 2010, 2012, 2015
ऑस्ट्रेलियन ओपन - 2003, 2005, 2007, 2009, 2010, 2015
फ्रेंच ओपन - 2002, 2013, 2015
यूएस ओपन - 1999, 2002, 2008, 2012, 2013, 2014
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा अंतिम सामन्‍यातील छायाचित्रे..