आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vera Zvonareva Hit In Olimpik But Flop Shop In Grand Slam

PHOTOS: ग्रँड स्लॅममध्‍ये सुपर फ्लॉप, पण कमाई 100 कोटी रूपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ- आंतरराष्‍ट्रीय टनिसपटू व्‍हेरा झ्वोनारेवा. फाईल फोटो )
टेनिस या खेळामधील ग्रँड स्लॅममध्ये चार सर्वात महत्त्वाच्या स्‍पर्धांमध्‍ये सुपर फ्लॉप ठरलेली रशियन टेनिसपटू व्हेरा झ्वोनारेवा हिची वार्षिक कमाई 100 कोटी रूपये आहे. सुमारे 86 कोटी रूपयांच्‍या प्राइज मनीसह ती जाहिरातीतूनही दणकेबाज कमाई करते. जिने आपल्‍या देशासाठी ऑलिम्‍पिक पदके जिंकली. पण ग्रँड स्लॅममध्‍ये ती सिंगल पुरस्‍कारही घेऊ शकली नाही. अशा या व्‍हेराविषयी divyamarathi.com आपल्‍याला माहिती देत आहे.
व्हेरा झ्वोनारेवा ही वयाच्‍या सहा वर्षांपासून टेनिस खेळते. 2008 मध्‍ये ऑलिम्पिक कांस्य पदक जिंकून आपल्‍या देशाचा सन्‍मान वाढवणा-या व्‍हेराने दोन वेळा ग्रँड स्लॅमच्‍या सिंगल इव्‍हेंटच्‍या अंतिम फेरीपर्यंम मजल मारली. पण यामध्‍ये ती साफ अपयशी ठरली. व्हेराने अापल्‍या कारकिर्दीत एकूण 12 स्‍पर्धा जिंकल्‍या.
तिच्‍या आईनेही जिंकले ऑलिम्पिक पदक
व्‍हेराची आई नतालिया हीदेखिल रशियासाठी खेळलेली आहे. ती आपल्‍या देशासाठी फिल्‍ड हॉकी खेळत होती. तिने ऑलिम्‍पिक पदकही जिंकले आहे. क्रीडा क्षेत्रात असे क्‍वचितच पाहायला मिळते की, माय-लेकीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करून ऑलिम्‍पिक पदकेही प्राप्‍त केली.
2000 मध्‍ये इंटरनॅशनल करियरला सुरूवात
व्‍हेराने सन 2000 मध्‍ये इंटरनॅशनल करियरला सुरूवात केली. 2001 मध्‍ये आयटीएफ (आंतरराष्‍ट्रीय टेनिस फेडरेशन) तिने जिंकली. मॉस्‍कोमध्‍ये ही स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आली होती. त्‍यामुळे व्‍हेराचा मॉस्कोशी खास संबंध राहिलेला आहे. कारण तिचा जन्‍मही तेथे झाला आणि तिला पहिला विजयदेखिल त्‍याच ठिकाणी मिळाला.
दुखापतीमुळे व्‍यत्‍ययही आला
व्‍हेरा हिला आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत गंभीर दुखापतीमुळे सुमारे दोन वर्ष खेळापासून लांबच राहावे लागले. 2005 मध्‍ये ती या खेळात 11 व्‍या स्‍थानावर होती. पण तिला झालेल्‍या दुखापतीमुळे ती खुप मागे पडली. 2007 मध्‍ये पुन्‍हा तिला एका दुखापतीचा सामना करावा लागला.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा व्हेरा झ्वोनारेवा हिचे काही ग्लॅमरस फोटो...