आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wimbledon Mixed Doubles Special Commemorative Book: Paes

विम्बल्डन मिश्र दुहेरीचा किताब विशेष स्मरणीय : पेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - कारकीर्दीतील१६ ग्रँडस्लॅम विजेतेपदांपैकी सर्वोत्तम कोणते, ते सांगण्यास नकार देऊन स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसच्या जोडीने यंदा मिळवलेले मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद कारकीर्दीतील विशेष स्मरणीय असल्याची पावती लिएंडर पेसने दिली.

सहाव्या सिडेड पेस-हिंगीस जोडीने पाचव्या सिडेड आॅस्ट्रिया-हंगेरीच्या अलेक्झांडर पेया-टिमेया बॅबोसचा केवळ ४० मिनिटांत ६-१, ६-१ असा दोन सेटमध्ये फज्जा उडवून काल विम्बल्डन मिश्र दुहेरी २०१५ च्या चषकावर नाव कोरले. कारकीर्दीतील किताबांपैकी कोणते सर्वोत्कृष्ट, असा विचार करीत नाही. मात्र, या स्पर्धेत दर्जेदार खेळ केल्याचे ताे म्हणाला.

भारतीय टेनिस त्रिकुटाचे तेंडुलकरकडून अभिनंदन
विम्बल्डनमध्येितरंगा उंचावणारे भारतीय स्टार लिएंडर पेस, सानिया मिर्झा सुमीत नागलचे सचिन तेंडुलकरने अभिनंदन केले आहे. सानिया लिएंडर पेसने मार्टिना हिंगीसच्या जोडीने अनुक्रमे महिला मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळवले, सुमीत ग्रँडस्लॅम ज्युनियर अजिंक्यपद मिळवणारा सहावा भारतीय असा इतिहास रचताना विम्बल्डन ज्युनियर दुहेरीच्या चषकावर नाम होआंग लीच्या जोडीने ताबा मिळवला. लिएंडर हिंगीसचे मनापासून अभिनंदन. या जोडीने आणखी एक ग्रँडस्लॅम जेतेपद आपल्या खात्यात जमा केले. तुम्ही तरुणांसाठी उत्तम आदर्श आहात, असे टि्वट त्याने केले.

१६ ग्रँडस्लॅम जेतेपदांनी उजळली कारकीर्द
पेसनेकारकीर्दीत आठ मिश्र दुहेरी अन् आठ पुरुष दुहेरी ग्रँडस्लॅम विजेतेपदांची माळ गळ्यात घातली आहे. हिंगीसच्या जोडीने एकाच मोसमातील हे त्याचे दुसरे मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद होय. आॅस्ट्रेिलयन ओपन २०१५ चा िकताबही या इंडो-स्विस जोडीच्या नावावर नाेंद अाहे.