आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आला हसीन जहाच्या Cheating चा पुरावा; तिकडे शमीच्या घरी पोहोचले पोलिस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा बॉलर मोहम्मद शमीवर आरोप लावणारी त्याची पत्नी हसीन जहाची पोलखोल करणारा एक पुरावा समोर आला आहे. हा पुरावा त्यांच्या लग्नाचेच सर्टिफिकेट आहे. शमीने नुकताच दावा केला होता, की हसीन जहाने आपल्या पहिल्या लग्नाचे रहस्य आपल्यापासून लपवले होते. त्याचा हाच दावा मॅरेज सर्टिफिकेटने सिद्ध केला आहे. शमी आणि हसीनजहाच्या स्वाक्षऱ्या असलेल्या या प्रमाणपत्रावर तिने आपण घटस्फोटित असल्याचे सांगितले नाही. उलट, प्रमाणपत्राच्या कॉलममध्ये आपण अविवाहित आहोत असा उल्लेख तिने केला. शमीनेच हा पुरावा ट्वीट केला आहे. 

 

तर दुसरीकडे, कोलकाता पोलिस आता शमीच्या उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील घरी पोहोचले आहेत. तसेच शमी आणि त्याच्या नातेवाइकांची चौकशी केली जाकत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, शमीवर त्याची पत्नी हसीन जहाने विवाहबाह्य संबंधांचे आरोप लावले. तसेच शमी आणि त्याच्या 4 नातेवाइकांवर हुंडाबळी, जिवे मारण्याचा प्रय्तन आणि मारहाणीचे आरोप लावत कोलकाता पोलिसांत एफआयआर दाखल केला. त्याच संदर्भात पोलिस शमीच्या घरी पोहोचले आहेत. त्याच्या कुटुंबियांची चौकशी करणाऱ्या पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, कुटुंब आणि आसपासच्या लोकांची सामान्य चौकशी झाली. 

 

काय म्हणाला होता शमी..?
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, शमीला हसीन जहाच्या पहिल्या लग्नाविषयी विचारण्यात आले होते. तेव्हा, लग्नापूर्वी आपल्याला याबद्दलची माहिती नव्हती असे शमी म्हणाला.
- इंटरव्यूमध्ये शमीने सांगितले, हसीन जहाने आपल्या पहिल्या लग्नासह दोन मुली असल्याची माहिती माझ्यापासून लपवली होती. 
- लग्नापूर्वी मुलींची भेट करून देताना त्या आपल्या बहिणीच्या मुली असून त्या बहिणीचा मृत्यू झाला असे ती शमीला कथितरीत्या म्हणायची.
- काळांतराने आपल्याला त्या मुली हसीन जहाच्याच असल्याचे कळाले. तेव्हा देखील आपण हसीन जहावर तितकेच प्रेम केले. उलट त्या मुलींचा खर्च उचलण्यासही सुरुवात केली.

बातम्या आणखी आहेत...