सलमान खानवर शोएब / सलमान खानवर शोएब अख्तरचे ट्वीट, भारत-पाकने एक होऊन केले Troll

दिव्य मराठी वेब टीम

Apr 07,2018 02:03:00 PM IST

स्पोर्ट्स डेस्क - काळ्या हरणाच्या शिकार प्रकरणी सलमान खानवर केलेल्या ट्वीटनंतर माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. विशेष म्हणजे, भारतासह पाकिस्तानातून सुद्धा त्याच्यावर लोक राग व्यक्त करत आहेत. शोएब अख्तरने ट्वीट करून सलमानला झालेल्या शिक्षेवर आपल्याला दुख होत असल्याचे म्हटले. त्यावरूनच त्याचे देश-परदेशातील चाहते भडकले आहेत.

काय म्हटला शोएब?
सलमानला झालेल्या शिक्षेवर शोएब अख्तरने एक ट्वीट केले. त्यानुसार, 'माझा मित्र सलमान खानला 5 वर्षांची कैद झाल्याबद्दल मला दुख होत आहे. पण, कायद्याने आपले काम करायलाच हवे. आपल्याला भारताच्या माननीय कोर्टाचा मान ठेवावा लागेल. तरीही मला असे वाटतेय की ही शिक्षा कठोर आहे. सलमानचे कुटुंबीय आणि फॅन्सच्या भावनांची मला जाणीव आहे. मला विश्वास आहे, की सलमान लवकरच बाहेर येईल.'

फॅन्स भडकले...
- माजी पाकिस्तानी क्रिकेटरने ट्वीट करून सलमानला आपले मित्र म्हटले, तसेच त्याच्या कुटुंबियांविषयी सहानुभूती सुद्धा व्यक्त केली. पण, पाकिस्तानसह भारतातील फॅन्सने सुद्धा त्याला ट्रोल करायला सुरुवात केली.
- प्रामुख्याने पाकिस्तानी फॅन्स शोएबवर भडकले. एका पाकिस्तानी चाहत्याने विचारले, तुला सलमानबद्दल वाइट वाटतेय, कधी अफगाणिस्तानातील मुलांविषयी तसे वाटले नाही.
- तर एका भारतीय फॅनने उत्तर दिले, पाकिस्तानी लोकांचे हे तर वैशिष्ट्य आहे असे म्हणावं लागेल. पाकिस्तानी लोक आपल्या छतावर उभेर राहून दुसऱ्यांच्या घरांमध्ये पाहण्यात मशगूल असतात.

पुढील स्लाइड्सवर पाहा, फॅन्सने शोएब अख्तरला अशा शब्दात केले ट्रोल...

X
COMMENT