आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पोर्ट्स डेस्क - पत्नीने लावलेल्या आरोप आणि एफआयरमुळे अडचणीत सापडलेला क्रिकेटर मोहम्मद शमीने आता पत्नीवरच नवीन आरोप लावले आहेत. पत्नी हसीन जहाने आपल्याशी लग्न करण्यापूर्वी तिचा एक पती होता आणि त्याच्यापासून दोन मुली आहेत हे सांगितलेच नव्हते. लग्नापूर्वी तिने आपल्यापासून ही गोष्ट लपवली होती असा आरोप शमीने केला आहे. त्याने एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा दावा केला.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, शमीला हसीन जहाच्या पहिल्या लग्नाविषयी विचारण्यात आले होते. तेव्हा, लग्नापूर्वी आपल्याला याबद्दलची माहिती नव्हती असे शमी म्हणाला.
- इंटरव्यूमध्ये शमीने सांगितले, हसीन जहाने आपल्या पहिल्या लग्नासह दोन मुली असल्याची माहिती माझ्यापासून लपवली होती.
- लग्नापूर्वी मुलींची भेट करून देताना त्या आपल्या बहिणीच्या मुली असून त्या बहिणीचा मृत्यू झाला असे ती शमीला कथितरीत्या म्हणायची.
- काळांतराने आपल्याला त्या मुली हसीन जहाच्याच असल्याचे कळाले. तेव्हा देखील आपण हसीन जहावर तितकेच प्रेम केले. उलट त्या मुलींचा खर्च उचलण्यासही सुरुवात केली.
पुढील स्लाइड्सवर वाचा, तिचा पहिला पती आणि या प्रकरणाची आणखी काही माहिती...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.