आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कौटुंबिक अडचणीला सामोरे जात आहे. त्याची पत्नी हसीन जहाने विवाहबाह्य संबंधांचे आरोप लावण्यासह त्याच्या विरोधात हुंडाबळीसह जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा एफआयआर दाखल केला. ज्या महिलेसोबत शमीचे नाव जोडण्यात आले ती पाकिस्तानी महिला आता समोर आली आहे. पाकिस्तानात राहणारी अलिश्बा हिने माध्यमाशी संवाद साधला तसेच त्या रात्री नेमके काय घडले याचा खुलासा केला आहे.
काय म्हणाली अलिश्बा?
मीडिया रिपोर्टनुसार, अलिश्बा म्हणाली "मी आणि शमी चांगले फ्रेंड आहोत. दुबईत माझी एक बहिण राहते. तसेच तिला भेटण्यासाठी मी नेहमीच पाकिस्तानातून दुबईला ये-जा करत राहते. शमीची आणि माझी भेट झाली त्यावेळी सुद्धा मी आपल्या बहिणीची भेट घ्यायला गेले होते."
- शमी दुबईत आल्याचे कळाल्यानंतर शमीची भेट घेतली होती. पण, त्या रात्री एक फॅन म्हणून त्याला भेटले होते. सोबतच आपण, शमीची खूप मोठी फॅन असून एक प्रशंसक म्हणूनच त्याला फॉलो करत असल्याचे ती म्हणाली.
- शमीच्या पत्नीने त्याच्यावर लावलेले मॅच फिक्सिंग आणि देशद्रोहाचे आरोपही अलिश्बाने फेटाळून लावले. शमी एक देशभक्त माणूस असून तो कधीच देशाला दगा देऊ शकत नाही. आपल्या दोघांमध्येही कुठल्याही प्रकारचा पैश्यांचा व्यवहार झाला नाही असेही ती पुढे म्हणाली.
- बीसीसीआयने कोलकाता पोलिसांना दिलेल्या माहितीप्रमाणे, मोहम्मद शमी दुबईच्या हॉटेलात 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी थांबलेला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.