स्पोर्ट्स डेस्क - श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या निदाहास टी-20 तिहेरी मालिकेतील शेवटच्या मॅचमध्ये बांग्लादेशच्या खेळाडूंनी लज्जास्पद कृत्य केले आहे. शेवटच्या लीग मॅचमध्ये त्यांनी श्रीलंकाविरुद्ध बांग्लादेशचा सामना करा किंवा मराच्या परिस्थितीत होता. यात बांग्लादेशी क्रिकेटर्स आणि त्यांचा कर्णधार शाकिब काहीही करण्यास तयार होते. शाकिब चक्क थर्ड अंपायरशी भिडला. फील्डवर वॉटर बॉय म्हणून आलेला नूरुल हसन श्रीलंकन खेळाडू थिसाराशी भांडायला लागला. यानंतर बांग्लादेशचा संघ जिंकला आणि जल्लोषात त्यांनी नागिन डान्स केला. तसेच ड्रेसिंग रुमच्या काचा देखील फोडल्या.
शेवटच्या ओव्हरमध्ये झाले असे काही...
- मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये बांग्लादेशला 12 धावा काढायच्या होत्या. त्यावेळी बांग्लादेशी खेळाडूंचे वर्तन धक्कादायक होते. श्रीलंकेने शेवटची ओव्हर फास्ट बॉलर उडानाला सोपविली. पहिला चेंडू शॉर्ट डिलिव्हरी होता. मुस्ताफिजुर रहमान तो खेळू शकला नाही. बॉल विकेटकीपरच्या मोज्यात गेली.
- दुसरा चेंडू बाउन्सर होता. तो देखील बांग्लादेशी बॅट्समन खेळू शकला नाही. त्यातच धाव काढण्यासाठी निघाला आणि धावबाद झाला. यावर संतप्त रहमानने चेंडू आपल्या खांद्यावरून गेल्याचे सांगत नो बॉल द्यावा अशी मागणी केली. पण, ती मान्य झाली नाही. तेव्हा बांग्लादेशला विजयासाठी 4 बॉलमध्ये 12 धावा हव्या होत्या.
असा झाला धिंगाणा...
त्याचवेळी बाउंड्री जवळ थांबलेला कर्णधार शाकिब-अल-हसन थर्ड अंपायरशी भिडला. एवढेच नव्हे, तर त्याने मैदानात उपस्थित मुस्ताफिजुर रहमान आणि महमदुल्लाह यांना परत बोलावण्याचा इशारा केला. प्रकरणाचे गांभीर्य पाहून बांग्लादेशचे कोच खालिद महमूद यांनी महमदुल्लाहला परत खेळण्यासाठी सांगितले.
मग केला नागिन डान्स
अखेर महमदुल्लाहने उडानाच्या तिसऱ्या बॉलमध्ये चौकार मारला. चौथ्या चेंडूमध्ये दोन धावा आणि पाचव्या चेंडूमध्ये षटकार मारून टीमला विजय मिळवून दिला. यानंतर उत्साही झालेल्या बांग्लादेशच्या अख्ख्या संघाने नागिन डान्स केला. एवढेच नव्हे, तर ड्रेसिंग रुममध्ये बेभान होऊन तोडफोड केली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, असा झाला ड्रेसिंग रुममध्ये धिंगाणा...