Home | Sports | ICC Cricket World Cup 2015 | Controversies | Actress Withdraws Rape Allegation From Bangladesh Cricketer Rubel Hossain

WC : टीमला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचवताच अभिनेत्रीने मागे घेतली Rape Case

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Mar 11, 2015, 03:32 PM IST

जानेवारी 2015 मध्ये रुबेलला तुरुंगात जावे लागले होते. मात्र, विश्वचषकात निवड झाल्याने त्याला तीन दिवसांतच न्यायालयाने जामीन दिला होता.

 • Actress Withdraws Rape Allegation From Bangladesh Cricketer Rubel Hossain
  विश्वचषकात चांगली कामगिरी केल्यामुळे अभिनेत्री नाजनीन हिने बांगलादेशचा क्रिकेटपटू रुबेल हुसेन विरोधात दाखल केलेला बलात्काराच खटला मागे घेतला आहे. डिसेंबर 2014 मध्ये नाजनीन हिने रुबेलवर हे आरोप केले होते. त्यानंतर जानेवारी 2015 मध्ये रुबेलला तुरुंगात जावे लागले होते. मात्र, विश्वचषकात निवड झाल्याने त्याला तीन दिवसांतच न्यायालयाने जामीन दिला होता.

  नाजनीन आणि रुबेल (संग्रहित छायाचित्रे)

  चांगल्या कामगिरीचा फायदा
  खटला मागे घेताना मंगळवारी ही अभिनेत्री म्हणाली की, मी रुबेलला माफ केले असून आता त्याच्या विरोधात न्यायालयात जाणार नाही. रुबेल संघासाठी चांगली कामगिरी करत आहे. या प्रकरणामुळे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव राहू नये म्हणून खटला मागे घेत असल्याचे तिने सांगितले. सोमवारी विश्वचषकात सर्वात मोठा उलटफेर करत बांगलादेशने इंग्लडला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. या सामन्यात रुबेल हुसेनने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या होत्या.

  माफीसाठी आधी ठेवली लग्नाची अट
  याआधी नाजनीनने रुबेल याच्यावरील खटला मागे घेण्यासाठी त्याच्यासमोर एक अट ठेवली होती. जर रुबेलने तिच्याबरोबर विवाह करण्याची तयारी दाखवली तर खटला मागे घेण्याची तयारी असल्याचे नाजनीन म्हणाली होती.

  असे होते प्रकरण...
  नाजनीन अख्तर नावाच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने 19 डिसेंबरला रुबेलवर शादीचे आमीष दाखवून बलात्कार केल्याचा खटला दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकराची चौकशीही सुरू केली होती. 8 जानेवारी 2015 ला ढाका येथील एका कोर्टाने रुबेलची जामीन याचिका फेटाळत त्याची तुरुंगात रवानगी केली होती. तर रुबेल हुसेनने मात्र नाजनीन आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचे म्हटले होते. लग्नाचे आश्वासन दिल्याची बाबही त्याने फेटाळली होती.

  पुढे वाचा, नाजनीन आणि रुबेलबरोबर तिच्या पहिल्या भेटीबाबत...

 • Actress Withdraws Rape Allegation From Bangladesh Cricketer Rubel Hossain
  कोण आहे नाजनीन

  नाजनीनने 2013 मध्ये बांगलादेशी चित्रपटांमध्ये पदार्पण केलो होतो. याच वर्षी आलेल्या तिचा 'किछु आशा भालोबाशा' हा चित्रपट बांग्लादेशात चांगलाच लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटामुळे तिच्याबरोबर हॅपी शब्द जोडला गेला होता.
   
  फेसबूकद्वारे झाली होती भेट
  नाजनीनने दिलेल्या माहितीनुसार फेसबूकद्वारे तिची रुबेल बरोबर भेट झाली होती. दोघांमध्ये सुमारे 9 महिन्यांपर्यंत संबंधही होते. नाजनीनच्या मते रुबेलने लग्नाचे आणीष दाखवून तिच्याशी शारिरीक संबध प्रस्थापित केले. पण नंतर त्याने लग्नाला नकार दिला. रुबेलचे दुसऱ्या एका तरुणीबरोबर सबंध असल्याचा आरोपही तिने लावला होता.
   
  पुढील स्लाइड्सवर पाहा, रुबेल हुसेनचे क्रिकेट करिअर
   
 • Actress Withdraws Rape Allegation From Bangladesh Cricketer Rubel Hossain
  रुबेलचे क्रिकेट करिअर

  रुबेल 2009 पासून बांगलादेशसाठी क्रिकेट खेळत आहे. आतापर्यंत त्याने 22 कसोटी सामन्यांमध्ये 32 तर 57 वनडे सामन्यांमध्ये 75 विकेट घेतल्या आहेत. 2010 मध्ये न्यूझालंडच्या विरोधात एका सामन्यात त्याने वन डेतील हॅटट्रीकही केली आहे.
   
  विश्वचषकात रुबेल हुसेनची कामगिरी
  विरुद्ध कामगिरी (विकेट/रन)
  अफगानिस्तान 1/27, 0*
  श्रीलंका 1/62, 0*
  स्कॉटलंड 0/60
  इंग्लंड 4/53
   

Trending