Home | Sports | ICC Cricket World Cup 2015 | Controversies | afridi sings mauka mauka after indias loss to australia

आफ्रिदीने मौका-मौका गाऊन उडवली टीम इंडियाची खिल्ली, व्हिडिओ झाला व्हायरल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 01, 2015, 12:57 PM IST

पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झालेल्या भारतीय क्रिकेट संघाची खिल्ली उडवली आहे.

  • afridi sings mauka mauka after indias loss to australia
    नवी दिल्ली - पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झालेल्या भारतीय क्रिकेट संघाची खिल्ली उडवली आहे. जेव्हा आफ्रिदीला विचारले, की ऑस्ट्रेलियाकडून भारताच्या पराभवावर तुमचे मत काय आहे. तेव्हा आफ्रिदीने वर्ल्डकप दरम्यानची प्रसिद्ध जाहीरात 'मौका-मौका'च्या काही ओळी गात भारतीय खेळाडूंना चिडवले. वर्ल्डकप दरम्यान, स्पोर्टस चॅनलने मौका- मौका नावाची अॅ़ड सिरीज सुरु केली होती.
    आफ्रिदीने भारतीय क्रिकेट संघाची खिल्ली उडवल्याचा व्हिडिओ इंटरनेवर भरपूर पाहिला जात आहे. या व्हिडिओमध्ये आफ्रिदी मौका-मौका गात असतो तेव्हा स्टुडिओतील दर्शक देखील त्याला साथ देतात. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचे प्रदर्शन अतिशय वाईट राहिले आहे.
    पुढील स्लाइडमध्ये पाहा व्हिडिओ

Trending