आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता सचिनची जर्सी देखील निवृत्त, कुणीच घालू शकणार नाही नंबर 10

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - फॅन्सचा वाढता विरोध पाहता बीसीसीआयने अखेर यापुढे जर्सी नंबर 10 कुणीच घालणार नसल्याचे स्पष्ट केले. हा नंबर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या जर्सीचा नंबर होता. इंडियन क्रिकेट बोर्डने जर्सी नंबर -10 ला निवृत्ती देत असल्याचे जाहीर केले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, क्रिकेटर शार्दुल ठाकूरने श्रीलंका विरोधात डेब्यु मॅचमध्ये 10 नंबरची जर्सी घातली होती. त्यावर सचिनच्या चाहत्यांनी तीव्र विरोध केला होता. तसेच शार्दुलला ट्रोल देखील केले होते. 

 

> मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जर्सी नंबर-10 ला निवृत्त देण्याची घोषणा करताना एका अधिकाऱ्याने सांगितले, विनाकारण या नंबरमुळे क्रिकेटर्स वादात अडकत होते. त्यांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागत होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हा नंबर रिटायर केला जात असला तरीही लिस्ट ए क्रिकेट्समध्ये त्यावर बंदी लावली जाणार नाही. 
> बीसीसीआयने हा निर्णय घेण्यापूर्वी काही क्रिकेटर्सचा सल्ला देखील घेतला होता. सचिनने 24 वर्षे याच नंबरची जर्सी घातली होती. त्यामुळे, त्यांनीही सचिनची ओळख बनलेल्या या जर्सीला निवृत्ती देण्याचे समर्थन केले आहे. 


पुढे पाहा, सचिनची जर्सीने दुसऱ्या क्रिकेटरने घालताच काय म्हणाले होते फॅन्स...

बातम्या आणखी आहेत...