Home | Sports | ICC Cricket World Cup 2015 | Controversies | World Cup: No Entry to Team India In Hotel

टीम इंडिया राहत असलेल्या हाॅटेलात प्रसारमाध्यमांना अखेर ‘नाे एन्ट्री’

दिव्य मराठी | Update - Mar 13, 2015, 05:17 AM IST

भारतीय संघाचे खेळाडू राहत असलेल्या हॉटेलात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मनाई आहे.

 • World Cup: No Entry to Team India In Hotel
  ऑकलंड - अाॅकलंड भारतीयसंघाचे खेळाडू राहत असलेल्या हाॅटेलात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेशास मनाई करण्यात अाली. संघ व्यवस्थापकांच्या अादेशामुळे हाॅटेल व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला अाहे. प्रसारमाध्यमांना हाॅटेलपासून १०० मीटरच्या अंतर दूर राहण्याचे सांगण्यात अाले.

  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी या हाॅटेलमध्ये चहा-काॅफी पिण्यासाठीही जाऊ शकणार नाहीत. हाॅटेलच्या बाहेर शूटिंग करण्यासही मनाई अाहे. ‘मीडिया मॅनेजर डाॅ. अार. एन. बाबा अाणि टीमचे संचालक रवी शास्त्री यांच्या अादेशामुळे हा निर्णय घेण्यात अाला,’ अशी माहिती सुरक्षा व्यवस्थापकांनी दिली. विराट कोहली-पत्रकार शिवीगाळ प्रकरणानंतर हा निर्णय झाला.

  पुढे वाचा... यूएईविरुद्ध सामन्याला गेल मुकणार

 • World Cup: No Entry to Team India In Hotel
  यूएईविरुद्ध सामन्याला गेल मुकणार

  नेपियर । वेस्ट इंडीजचा यूएईविरुद्ध रविवारी सामना आहे. जखमी गेल सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. बुधवारी तो सरावास उतरला नाही. प्रशिक्षक विलियम्स म्हणाले, त्याने सर्व सामने खेळावे अशी आमची इच्छा आहे. त्याची दुखापत कमी करून त्याला या सामन्यात खेळवू.
   
  पुढे पाहा.. स्टेडियममध्ये सन्नाटा
 • World Cup: No Entry to Team India In Hotel
  स्टेडियममध्ये सन्नाटा
  वेलिंग्टन | आफ्रिका व यूएई सामन्यादरम्यान स्टेडियम रिकामे होते. सुरक्षा रक्षकांनीही सामन्याचा आनंद लुटला.
   
  पुढे वाचा.. विराटला पुढे जायचे आहे : व्हाटमोर
 • World Cup: No Entry to Team India In Hotel
  विराटला पुढे जायचे आहे : व्हाटमोर

  ऑकलंड । कोहलीला मोठी कारकीर्द घडवायची आहे. त्याने आता चांगले यश मिळवले असून त्याला आणखी यश गाठायचे आहे, असे मत झिम्बाब्वेचे प्रशिक्षक डेव व्हाटमोर यांनी व्यक्त केले. व्हाटमोर भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक असताना कोहली आणि जडेजाने आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली.
   
  वाचा... धोनीला पर्याय नाही : इयान स्मिथ
 • World Cup: No Entry to Team India In Hotel

  धोनीला पर्याय नाही : इयान स्मिथ
  ऑकलंड ।  महेंद्रसिंग धोनीने निवृत्ती घेतल्यावर त्याला पर्याय मिळणे कठीण आहे. यष्टिरक्षक आणि फलंदाज धोनीला सध्या कोणीही आव्हान देऊ शकत नाही. मात्र,  संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी हे नेहमीचे आव्हान असल्याची प्रतिक्रिया न्यूझीलंडच्या इयान स्मिथने दिली.

Trending