विश्‍वचषक: ताहिरचा उन्मादी / विश्‍वचषक: ताहिरचा उन्मादी आनंद कशासाठी?

वृत्तसंस्था

Mar 19,2015 02:00:00 AM IST
सिडनी - श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक विकेट घेतल्यानंतर उन्मादी आनंद का साजरा केला, याचे स्पष्टीकरण देण्यात दक्षिण आफ्रिकेचा लेग स्पिनर इम्रान ताहिर असमर्थ आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर उपस्थित चाहत्यांनी पाकमध्ये जन्मलेल्या ताहिरला विकेट घेतल्यानंतर आनंद व्यक्त करताना, हवेत ठोसा मारताना आणि आऊटफील्डवर धावताना पाहिले. ‘ही
स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. मी याचा कोणताही सराव केला नाही. मी स्टोकमधील (इंग्लंड) क्लबस्तरीय सामने खेळत होतो आणि चांगला झेल घेतला. आनंदाच्या भरात मी मैदानाच्या बाहेर धावत होतो. धावताना रस्त्यावर आल्याचेही मला समजले नाही. ही सर्व सत्य घटना आहे,’अशी प्रतिक्रिया ताहिरने दिली. त्याने सामन्यात बुधवारी चार बळी घेतले. ‘ही
प्रतिक्रिया यासाठी आहे की, या टीमसाठी जे काही करत आहे, त्याचा आनंद घेऊ इच्छितो. हे एक स्वप्न होते, असे ताहिर म्हणाला.
X
COMMENT