Home | Sports | Other Sports | Hima Das Coach Nipon Das Accused Of Rape By Another Female Athlete In Assam

हिमा दासला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारे Coach निपोन दास यांच्यावर लागले लैंगिक शोषणाचे आरोप

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 30, 2018, 12:44 PM IST

100, 200 मीटर अॅथलेटिक्समध्ये त्या महिलेने निपोन यांच्याकडून गुवाहाटीच्या इंदिरा गांधी स्टेडिअममध्ये ट्रेनिंग घेतली होती

  • Hima Das Coach Nipon Das Accused Of Rape By Another Female Athlete In Assam

    स्पोर्ट्स डेस्क - आयएएफ वर्ल्ड अंडर-20 मध्ये अॅथलेटिक चॅम्पियनशिपचे सुवर्ण पदक जिंकून भारताचे नाव साऱ्या जगात चमकवणारी हिमा दास हिच्या कोचवर बलात्काराचे आरोप लागले आहेत. हिमा दासचे देश आणि परदेशात जेवढे कौतुक केले जात आहे त्या सर्वांचे श्रेय तिचे कोच निपोन दास यांना जाते. परंतु, त्याच कोचवर आसामच्या एका महिला खेळाडूने लैंगिक शोषणाचा आरोप दाखल केला आहे. 100 आणि 200 मीटर अॅथलेटिक्समध्ये त्या महिलेने निपोन यांच्याकडून गुवाहाटीच्या इंदिरा गांधी स्टेडिअममध्ये ट्रेनिंग घेतली होती. तिने आंतरशालेय राष्ट्रीय टूर्नामेंट सुद्धा खेळले आहेत. तिने सांगितल्याप्रमाणे, सौरासाजी येथे मे महिन्यात ट्रेनिंग सुरू असताना निपोन यांनी तिच्यावर अत्याचार केला.


    महिला खेळाडूने लावलेल्या आरोपानुसार, कोच निपोनने अत्याचार करून तिला धमकावले होते. या विषयी कुणालाही सांगितल्यास ट्रेनिंग बंद केली जाईल असे ते म्हणाले होते. परंतु, महिला मुळीच घाबरली नाही आणि 22 जून रोजी बसिस्था पोलिस स्टेशनमध्ये तिने निपोन यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. आसामच्या क्रीडा आणि युवा कल्याण विभागाचे आयुक्त आणि सचिव आशुतोष अग्निहोत्री यांनी या वृत्तास अधिकृत दुजोरा दिला. पोलिसांनी सांगितले, की कोच निपोन यांच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम 342, 354, 376, 511 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी पीडितेच्या मेडिकल रिपोर्टची प्रतीक्षा केली जात आहे असे बसिस्था पोलिस स्टेशनच्या पोलिस उपाधीक्षक नंदिनी कलिता यांनी सांगितले.


    काय म्हणाले निपोन..?
    कोच निपोन यांनी एक ऑडियो क्लिप जारी करून आपल्यावर लावलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितले, "माझ्यावर आरोप लावणारी महिला खेळाडू टीममध्ये निवड करण्यासाठी दबाव टाकत होती. परंतु, माझ्या हातात काहीच नव्हते. 26 ते 29 जून दरम्यान गुवाहाटी येथे झालेल्या आंतरराज्यीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली नाही. त्याचाच राग काढत तिने माझ्या विरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. ही महिला खेळाडू हिमावर जळत होती. हिमा चॅम्पियन झाली तेव्हा तिच्यासह माझे नाव सुद्धा जगभरात लोकप्रीय झाले. हे तिला आवडले नाही."

Trending