आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमरोहा (उत्तर प्रदेश) - पत्नी हसीन जहाँने केलेल्या विवाहबाह्य संबंधांच्या आरोपानंतर क्रिकेटर मोहम्मद शमी प्रथमच मीडियासमोर आला आहे. गुरुवारी तो त्याच्या गावी पोहोचला. येथे पत्रकार परिषदेत त्याने सर्व आरोप फेटाळले आहे. तो म्हणाला की माझ्याविरोधात ठरवून एक षडयंत्र रचले जात आहे. ज्या मोबाइल क्रमांकाचा उल्लेख करण्यात आला आहे तो माझा नाही. काही लोकांचा दुसऱ्याच्या यशाने जळफळाट होतो. असेच काही बाहेरचे लोक या आरोपांच्या मागे असले पाहिजे. झालेले गैरसमज दूर करण्यासाठी मी पत्नी आणि मुलीची भेट घेणार आहे. त्यांची माफी मागण्यासही मला हरकत वाटत नाही.
पत्नीसोबत राहाण्याची इच्छा
- टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीवर त्याची पत्नी हसीन जहाँने खळबळजनक आरोप केले होते.
- त्यावर शमी म्हणाला, 'आमच्या लग्नाला 4 वर्षे झाली आहे. तिला हे का लक्षात आले नाही की हे एक षडयंत्र आहे. मला पत्नी आणि कुटुंबासोबत राहाण्याची इच्छा आहे.'
- शमीने पत्नीसोबतच्या ताज्या आठवणी मीडियासोबत शेअर केल्या. तो म्हणाला, 'आम्ही नुकतीच होळी सोबत साजरी केली. काही दिवसांपूर्वी साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर शॉपिंगसाठी गेलो होतो. तिथे तिने ज्वेलरी खरेदी केली होती. या प्रकरणात ज्या नंबरचा उल्लेख होत आहे तो माझा नाही. तो फोन माझा नाही आणि मी कोणासोबत काही बोललो नाही.'
हसीन जहांने शमीवर हे आरोप केले आहेत...
"तो मला जिवे मारण्याची धमकी देत होता. मी त्याच्या BMW मधून पर्सनल फोन आणि मेल कॉन्ट्रासेप्टिव्ह हस्तगत केले होते. त्याच फोनने अनेक तरुणींशी अश्लील चॅटिंग, मेसेज आणि फोटोज केल्याचे आढळले."
"आम्हा दोघांचे मागच्या 2 वर्षांपासून नातेसंबंध ठीक नाहीत. 8 जानेवारी रोजी यूपीमध्ये माझ्यावर कौटुंबिक हिंसाचार झाला. तेथून कोलकात्याला परतल्यानंतर मी स्थानिक पोलिसांत तक्रार दिली. आता कायदेशीर कारवाई करीन."
"माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. शमीचे पूर्ण कुटुंबच मला प्रत्येक वेळी शिवीगाळ करत होते. सूर्योदयापासून सुरु होणारे टॉर्चर सत्र रात्रीच्या 2-3 वाजेपर्यंत सुरूच असायचे. यामुळेच मी जाधवपुर पोलिसांत माहिती दिली होती. तेव्हा मला कुटुंबाविरुद्ध कोणतीही कारवाई होऊ नये असे वाटत होते."
"मी सर्वकाही ठीक होण्यासाठी लाख प्रयत्न केले. मी शमीला वेळ दिला. स्वत:चीही समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण आता माझा संयम संपला आहे. एवढे सगळे होऊनही शमी आपली चूक कबूल करण्याऐवजी मलाच धमकी देत होता. म्हणायचा- अपनी जिंदगी बर्बाद मत करो, जिंदगी खराब मत करो, समझा रहा हूं तुम्हें. जैसे रह रही थी, हाथ-पैर समेटकर वैसे ही रहो."
"जेव्हापासून मी फेसबुकवर पोस्ट टाकली आहे, तेव्हापासून शमी माझ्याशी बोलला नाही. तो फक्त एका महिलेशी बोलत नव्हता. मी फेसबुकवर ज्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट्स टाकले आहेत ते तर काहीच नाहीत. शमीचे काही कारनामे तर अतिशय घाणेरडे आहेत."
"दक्षिण आफ्रिका दौऱ्याहून परतल्यानंतरही शमीने मारहाण केली. आता मी सर्व पुराव्यांसह पोलिसांकडे जाणार आहे."
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, काय आहे प्रकरण...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.