आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन - क्रिकेटच्या छाेट्या टी-२० फाॅरमॅटने सध्या जगातील कानाकाेपऱ्यातील चाहत्यांना वेड लावले अाहे. त्यामुळे काही शतकांचा वारसा लाभलेल्या कसाेटी, वनडेपेक्षाही या छाेट्या फाॅरमॅटला अल्पवाधीमध्ये माेठी प्रसिद्ध मिळाली. जगभरातील काेट्यवधी चाहत्यांची टी-२० क्रिकेटच पहिली पसंती अाहे.
हीच गाेष्ट लक्षात घेऊन अाता इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने क्रिकेटच्या विश्वात नव्या स्वरूपाचा फाॅर्म्युला वापरण्याचा निर्णय घेतला अाहे. यातूनच अाता लवकरच १०० चेंडूंच्या सामन्यांचे अायाेजन केले जाईल. या प्रयाेग ईसीबीच्या वतीने २०२० मध्ये राबवण्याचा प्रयत्न अाहे. यासाठीचा प्रस्ताव नुकताच ईसीबीच्या वतीने तयार करण्यात अाला. अायसीसीच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव दाखल हाेईल. २०२० मधील स्पर्धेदरम्यान ३८ दिवसांत एकूण ३६ सामने अायाेजित करण्याचा ईसीबीचा मानस अाहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आज देशांतर्गत क्रिकेटमध्ये १०० चेंडूंच्या सामन्याच्या प्रस्ताव ठेवला आहे. याची सुरुवात २०२० मध्ये होणार असून यात महिला व पुरुषांचे ८ संघ त्यांच्या गटातून खेळणार आहेत. यासाठी संघांचीही निवड केली जाईल.
या स्पर्धेत १०० चेंडू एका डावात टाकले जाणार अाहेत. यामुळे क्रिकेटकडे मोठ्या प्रमाणावर चाहते वळतील तसेच मोठ्या प्रमाणावर चाहते त्यांच्या परिवारासोबत सामने पाहायला येतील. तसेच तरुण चाहतेही या स्पर्धेला लाभतील, असे आजच्या बैठकीत सांगण्यात आले. यामुळे क्रिकेटची प्रसार व्हायलाही उपयोग होईल. या १०० चेंडूंच्या डावात १५ षटके ही पारंपरिक पद्धतीने टाकली जातील तर राहिलेले १० चेंडू हे वेगळी रणनीती आखून टाकण्यात येतील.
असे राहील स्वरूप
नव्याने प्रस्तावित करण्यात अालेल्या १०० चेंडूंच्या सामन्याचे स्वरूपही जरा हटकेच अाहे. यामध्ये डावातील पहिली १५ षटके पारंपरिक पद्धतीने टाकली जाणार. म्हणजे एका अाेव्हरमध्ये सहा चेंडू टाकले जातील. त्यानंतर शेवटच्या म्हणजेच १६ व्या षटकात गाेलंदाजाला १० चेंडू टाकावे लागणार अाहेत.
महिला व पुरुष गटात स्पर्धा : ही नव्याने हाेणारी १०० चेंंडूंची स्पर्धा महिला अाणि पुरुषांच्या गटात रंगणार अाहे. यामध्ये दाेन्ही गटांत प्रत्येकी अाठ संघांचा समावेश असेल.
उद्देश : नवीन चाहत्यांना क्रिकेटकडे आकर्षित करणे, क्रिकेटचा प्रसार मोठ्या प्रमाणावर करणे, क्रिकेटमध्ये नावीन्य आणणे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.