आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ball Tampering: श्रीलंकेचा कर्णधार दोषी; कोच, व्‍यवस्‍थापकासह 6 सामन्‍यांची बंदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्‍पोर्ट्स डेस्‍क - विंडीजविरुद्ध कसाेटी सामन्यातील गैरवर्तन श्रीलंकन संघाला चांगलेच महागात पडले. याप्रकरणी आयसीसीने कडक कारवाईचा बडगा उगारला. अायसीसीने साेमवारी श्रीलंका क्रिकेट संघाच्या कर्णधार दिनेश चांदिमल, प्रशिक्षक चंडिका हथारुसिंघा आणि व्यवस्थापक असंका गुरुसिंघावर नुकतीच बंदीची कारवाई केली. या सर्वांचे चार वनडे अाणि दाेन कसोटी सामन्यांसाठी निलंबन करण्यात अाले. 


गत महिन्यात श्रीलंका संघाने विंडीजविरुद्ध कसाेटी सामन्यादरम्यान गैरवर्तन केले. चांदिमलने चेंडूंशी छेडछाड केल्याचेही समाेर अाले. तसेच या प्रकरणानंतर श्रीलंका संघ तब्बल दोन तासांनंतर मैदानावर परतला होता. एकूणच या साऱ्या वर्तनातून श्रीलंका संघाने अायसीसीच्या अाचारसंहिता २३.१ च्या स्तरावरील तीन नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळेच टीमवर ही कडक कारवाई करण्यात अाली. अायसीसीने या प्रकरणाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली.

बातम्या आणखी आहेत...