आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिजिओच्या चुकीमुळे धोक्यात पडू शकते साहाचे करिअर, बॅटही उचलू शकत नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या भारतीय क्रिकेट संघात दुखापतग्रस्त खेळाडूंची संख्या वाढत आहे. इंग्लडविरुद्ध टेस्ट सिरीज सुरु होण्यापूर्वीच कर्णधार कोहलीला तीन मुख्य खेळाडू गमवावे लागले. विकेटकिपर वृद्धिमान साहा, गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह हे तिन्ही खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. या सर्वांमध्ये साहाला झालेल्या दुखापतीमुळे सर्वजण चिंतेत आहेत. कारण एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशन चालू असेल्या साहाचे करिअर धोक्यात येऊ शकते कारण फिजिओने ट्रेनिंग दरम्यान काहीतरी चूक केली.


बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने मान्य केले आहे की, साहाची दुःखापत रिहॅब ट्रेनींगमध्ये झालेल्या चुकीमुळे वाढली आहे. फिजिओच्या चुकीमुळे साहाची दुखापत आणखी वाढली आहे. साहाला लगेच सर्जरी करावी लागणार आहे आणि यामुळे तो इंग्लड दौऱ्यावर तसेच वर्षाच्या शेवटी होणाऱ्या ऑस्टेलिया दौऱ्यावरही जाऊ शकणार नाही. सर्जरीनंतर साहा मैदानावर उतरू शकतो परंतु दोन-तीन महिने त्याला बॅटही उचलता येणार नाही.


बीसीसीयआय अधिकाऱ्याने असेही सांगितले की, साहाच्या अंगठ्याची दुखापत आधीच ठीक झाली होती. खांद्यामध्ये थोडासा त्रास होता परंतु एमसीए फिजिओच्या चुकीमुळे खांद्याची दुखापत आता जास्त वाढली आहे.

बातम्या आणखी आहेत...