आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - अापल्याच निर्णयावर ठाम राहिल्याने अाता पुन्हा एकदा अांतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (अायसीसी ) अाणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीअाय) समाेरासमाेर अाले अाहे. विचारामधील मतभेदामुळे यांच्यात अाता वादाची ठिणगी पडली अाहे.
मतभेदाचा विषय या दाेघांमधील वादात नवीन नाही. मात्र, अाता चॅम्पियन्स ट्राॅफीच्या स्वरूपाच्या विषयावर अायसीसी अाणि बीसीसीअायमध्ये मतभेद निर्माण झाले अाहेत. तसेच राेषही वाढला अाहे.
बीसीसीअायला २०२१ च्या चॅम्पियन्स ट्राॅफीचे यजमान भूषवण्यासाठी संधी अाहे. ही स्पर्धा भारतामध्ये अायाेजित करण्याच्या निर्णयावर शिक्कामाेर्तब अाहे. मात्र, या स्पर्धेच्या फाॅरमॅटवरून या दाेघांमध्ये विराेध निर्माण झाला. अायसीसीने अाता चॅम्पियन्स ट्राॅफीच्या स्वरूपात बदल करण्याच्या हालचाली सुरू केल्या.
यासाठी अायसीसीने वनडेच्या जागी टी-२० च्या फाॅरमॅटला पंसती दर्शवली. दुसरीकडे चॅम्पियन्स ट्राॅफीच्या स्वरूपात काेणत्याही प्रकारचा बदल करण्यात येऊ नये, असे बीसीसीअायचे मत अाहे. याच मतावर बीसीसीअायने ठाम भूमिका घेतली. त्यामुळे बीसीसीअाय ट्राॅफीच्या यशस्वी अायाेजन उत्सुक अाहे.
कमाईसाठी अट्टहास : अायसीसीची नजर अाता चॅम्पियन्स ट्राॅफीच्या माध्यमातून भरघाेस कमाईवर लागली अाहे. त्यामुळे झटपट फाॅरमॅट टी-२० च्या स्पर्धा अायाेजनातून अायसीसीला निश्चित असा हेतूही साध्य करता येईल. याला चाहता वर्गही माेठ्या प्रमाणात लाभण्याची शक्यता अाहे.
महसूल ताेट्याची भीती
अायसीसीला भारतामध्ये हाेणाऱ्या चॅम्पियन्स ट्राॅफीदरम्यान माेठ्या प्रमाणात अार्थिक नुकसानीची भीती अाहे. येथील महसुलामुळे अायाेजनामध्ये माेठा ताेटा येऊ शकताे, असा खबरदारीचा सल्ला एका सदस्याने अायसीसीला दिला अाहे. ही अार्थिक तूट भरून काढण्यासाठीच अायसीसीने वनडेएेवजी टी-२०च्या फाॅरमॅटला पसंती दर्शवली अाहे.
तर...यजमानपद पाकला मिळू शकेल
अायसीसीने स्पर्धा अायाेजनासाठी भारत सरकारकडे करामध्ये सूट मागितली हाेती. मात्र, ही सवलत मिळाली नाही. यामुळे अायसीसीचा बीसीसीअायवर राेष निर्माण झाला. अापल्या मतावर ठाम असलेली अायसीसी यजमानपदासाठी दुसऱ्या देशाच्या नावावरही शिक्कामाेर्तब करण्याची शक्यता अाहे. अशात गत विजेत्या पाकला यजमानपदाची संधी मिळू शकेल.
दालमियांच्या नावावर बीसीसीअाय ठाम
दिवंगत माजी अध्यक्ष जगमाेहन दालमिया यांच्या मार्गदर्शनाखाली चॅम्पियन्स ट्राॅफीच्या अायाेजनाला सुरुवात झाली. त्यांनीच वनडेच्या स्वरूपात या ट्राॅफीला चालना दिली. त्यामुळे २०२१ मध्ये या स्पर्धेदरम्यान दालमिया यांची पाचवी पुण्यतिथी असेल. यातूनच ही स्पर्धा वनडे स्वरूपात अायाेजित करण्याच्या विचारावर बीसीसीअाय ठाम अाहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.