आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकला नमवून भारताने जिंकला स्नूकर टीम विश्वचषक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाेहा - भारतीय संघ अायबीएसएफच्या जागतिक स्पर्धेत विश्वविजेता ठरला. भारताने अापल्या पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा स्नूकर टीम वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पराभव केला. भारताने ३-२  ने अंतिम सामन्यात विजय संपादन केला. वर्ल्ड चॅम्पियन पंकज अडवाणी अाणि मनन चंद्रा यांनी फायनलमध्ये उल्लेखनीय खेळी करताना वर्ल्डकप मिळवून दिला. 

 
पिछाडीवर पडल्यानंतरही पंकज अाणि मननने सुरेख कामगिरी केली. बेस्ट अाॅफ फाइव्हमध्ये भारताची सुरुवात निराशाजनक ठरली. यामुळे पहिल्या फ्रेममध्ये बाबर अाझमने भारताच्या मननवर मात केली. त्याने ७३-२४ ने हा फ्रेम जिंकला. यासह पाकने लढतीत अाघाडी घेतली. त्यापाठाेपाठ दुसऱ्या फ्रेममध्ये पंकजला सुमार खेळीचा फटका बसला. त्यालाही पराभवाचा सामना करावा लागला.    


दुहेरीतून केले पुनरागमन :
मननने तिसऱ्या फ्रेममध्ये दुहेरीत भारताला चांगली सुरुवात करून दिली. पंकज अाणि मनन यांनी चांगली खेळी केली अाणि हा तिसरा फ्रेम जिंकला. त्यानंतर पंकजने चाैथ्या फ्रेममध्ये बाबर मसीहला पराभूत केले. यासह त्याने भारताला २-२ ने बराेबरी मिळवून दिली. त्यानंतर पाचव्या अाणि निर्णायक पाचव्या फ्रेममध्ये मननच्या खेळीवर सर्वांचे लक्ष लागून हाेते. त्यानेही सुरेख खेळी करताना अासिफला पराभूत केले. यासह त्याने ३-२ ने भारताचा विजय निश्चित केला.

बातम्या आणखी आहेत...