आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्‍तीमध्‍ये नवज्याेतला सुवर्ण; भारताची पहिली महिला एशियन चॅम्पियन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिश्केक (किर्गिस्तान) - भारताच्या नवज्याेत काैरने शनिवारी एशियन कुस्ती स्पर्धेत चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. याशिवाय तिचे हे साेनेरी यश एेतिहासिक ठरली. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी २८ वर्षीय नवज्याेत काैर ही भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली. दुसरीकडे या स्पर्धेत अाॅलिम्पियन साक्षी मलिक ६२ किलाे फ्रीस्टाइलमध्ये कांस्यपदकाची मानकरी ठरली. तिला अनपेक्षित पराभवामुळे अंतिम फेरीचा पल्ला गाठता अाला नाही.

 

मात्र, तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीमध्ये तिने बाजी मारली. यासह भारताला या दाेन पदकांची कमाई करता अाली. अाता भारताच्या नावे या स्पर्धेत सहा पदकांची नाेंद झाली. यामध्ये प्रत्यकेी एका सुवर्ण, राैप्यसह चार कांस्यपदकांचा समावेश अाहे.   


५ वर्षांनंतर नवज्याेतचे दुसरे पदक : एशियन कुस्ती स्पर्धेत नवज्याेत काैरचे हे दुसरे पदक ठरले. तिने यापूर्वी २०१३ मध्ये या स्पर्धेत राैप्यपदकाची कमाई केली हाेती. त्यानंतर पाच वर्षांनंतर तिने सुवर्णपदक पटकावले.   


भारताचे ठरले पहिले सुवर्णपदक : एशियन चॅम्पियनशिपमधील नवज्याेत काैरचे हे यश भारतीय संघासाठीही महत्त्वपूर्ण ठरले. तिच्या साेनेरी यशामुळे भारताच्या नावे या स्पर्धेत पहिल्या सुवर्णपदकाची नाेंद झाली. नवज्याेतमुळे भारताला स्पर्धेत  यश संपादन करता अाले अाहे.   


पहिल्या हाफमध्ये अाघाडी : महिलांच्या ६५ किलाे वजन गटातील नवज्याेत काैर अाणि मिया इमाई यांच्यातील फायनल मुकाबला अधिक लक्षवेधी ठरला. जपानच्या मियाने दमदार सुुरुवात करताना पट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नवज्याेतने सुरेख डिफेन्स करताना तिचा हा प्रयत्न हाणून पाडला.  दरम्यान, नवज्याेतने क्षणात काउंटर अॅटॅक करून २-० ने अाघाडी मिळवली.  शेवटच्या २० सेकंदांतही तिने एक गुण संपादन करून अाघाडी ३-० ने मजबूत केली. दाेन गुण मिळवून तिने पहिल्या हाफमध्ये ५-० ने अाघाडी मिळवली. यासह तिने अापला दबदबा निर्माण केला.  


...घेतले ४ गुण : पिछाडीवर पडलेल्या मियाने दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच नवज्याेतचा डावा पाय पकडला. मात्र, नवज्याेतने काउंटर अॅटॅक करून थेट ४ गुणांची कमाई केली. यासह तिने एकूण ९-१ ने ही लढत अापल्या नावे केली. त्यामुळे मियाला दरम्यानच्या सुमार खेळीमुळे धूळ चाखावी लागली.

बातम्या आणखी आहेत...