आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अार्थिक अडचणींमुळे क्रिकेट साेडण्याचे अाईने सांगितले हाेते; अाता सर्वाेत्कृष्ट अाॅलराऊंडर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक वेगवान गाेलंदाज अाणि तळातला अाक्रमक फलंदाज अांद्रे रसेलने अापल्या शैलीदार खेळीच्या बळावर मर्यादित षटकांच्या लीगमध्ये लक्षवेधी कामगिरी केली. हातात चेंडू असला की, ताे १४० किमी/प्रति तासाच्या वेगाने टाकताे अाणि त्याच ताकदीने ताे फलंदाजीही करताना दिसताे. त्यामुळेच वाऱ्याच्या वेगाने चेंडू सीमारेषेपार जायला वेळ लागत नाही. असे असतानाच ताे क्षेत्ररक्षणातही निष्णात अाहे. त्यामुळे त्याचे नेहमीच काैतुक हाेते.

 

एकूणच क्रिकेटच्या मैदानावरील त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली अाहे. या जमैकन क्रिकेटपटूच्या करिअरमध्ये कुटुंबीयांचे याेग्य फारसे महत्त्वपूर्ण राहिले नाही. त्याला त्यांचे पाठबळही फारसे मिळू शकले नाही. कारण, घरची अार्थिक परिस्थिती अगदीच जेमतेम हाेती. त्यामुळे कुटुंबीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत हाेता. याच कारणामुळे त्याच्या अाईने त्याला क्रिकेट साेडण्याचा सल्ला दिला हाेता. याच वेळेत ताे अापल्या कुटुंबीयांना अार्थिक अडचणींवर मात करण्यासाठी हातभार लावू शकेल, असेच त्याच्या अाईला वाटत हाेते. चार बहिणी-भावांमध्ये अांद्रे रसेल हा सर्वात माेठा हाेता. त्यामुळे साहजिकच त्याच्याकडून अाईला ही अाशा हाेती, असेही त्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले.  


अागामी दाेन वर्षांत क्रिकेटमधून काहीच मिळाले नाही, तर मी अापणहून क्रिकेट खेळणेच साेडून देईल,असा शब्दच अाईला दिला हाेता, असेही ताे म्हणाला. मात्र, ही परिस्थितीच माझ्यावर अाेढवली नाही.   


वयाच्या १९ व्या  वर्षी त्याला जमैकाकडून देशांतर्गत लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली हाेती. २०१० मध्ये बर्मिंगहॅम लीगमध्ये ताे बर्नाड्स ग्रीन क्रिकेट टीमकडूनही खेळला. त्याने या टीमकडून खेळताना ७९९ धावा अाणि ३९ विकेट घेतल्या हाेत्या. त्यानंतर २१ व्या वर्षी त्याची विंडीजच्या राष्ट्रीय संघात निवड झाली. सुरुवातीच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याच्यावर व्हिव्हियन रिचर्डस यांनी काैतुकाचा वर्षाव केला. भविष्यातील क्रिकेटर अशी उपमाही त्यांनी दिली हाेती. २०१२ मध्ये दिल्लीच्या टीमने त्याला अायपीएलसाठी खरेदी केले हाेते. या टीमकडूनही त्याची कामगिरी काैतुकास्पद ठरली.  


ताे दाेन वेळच्या विश्वविजेत्या विंडीज (२०१२, २०१६) टीमचा सदस्य खेळाडूही राहिलेला अाहे. विंडीजने हे दाेन्ही किताब टी-२० च्या फाॅरमॅटमध्ये जिंकले अाहेत. याशिवाय ताे पाच देशांच्या लीगमध्येही खेळला अाहे. त्याने बीग बॅशमध्ये मेलबर्न रेनेगेड्स, बीपीएलमध्ये सिलहट राॅयल्स, खुलना राॅयल्स, कॅरेबियन लीगमध्ये जमैका तलावाज अाणि पीएसएलमध्ये इस्लामाबाद युनायटेडच्या टीमचे प्रतिनिधीत्व केले अाहे.   


अाक्रमक स्वभावामुळे ताे अनेक वेळा वादाच्या भाेवऱ्यातही सापडला अाहे. याशिवाय डाेपिंगमुळे त्याला शिक्षेलाही सामाेरे जावे लागले हाेते. त्याच्यावर गत वर्षी डाेपिंगमुळे वर्षभराची बंदीही घालण्यात अाली हाेती. मात्र, अाता त्याचा फेब्रुवारीमध्ये पुनरागमनाचा मार्गही माेकळा झाला.   
त्याला संगीताचेही भारी वेड अाहे. त्याने २०१४ मध्ये ‘द्रे रस’ नावाने रेकाॅर्डिंग अार्टिस्टच्या रुपाने करिअरला सुरुवातही केली. याशिवाय त्याने जमैकाच्या सिंगर बीनी मॅनसाेबत दाेन अल्बमही काढले अाहेत. त्यामुळे त्याच्या या संगीताने अाता इतरांनाही चांगलेच वेड लावले अाहे.

बातम्या आणखी आहेत...