आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई संघाचा विजयी चाैकार; काेलकात्याचा केला पराभव,सूर्यकुमारचे सलग तिसरे अर्धशतक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पराभवाची मालिका खंडित करताना अाता गत चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघ यंदाच्या ११ व्या सत्राच्यातील इंडियन प्रीमियर लीगमध्ये विजयी ट्रॅकवर पतरला. मुुंबई संघाने सलग दुसऱ्या विजयाच्या बळावर अाता प्ले अाॅफमधील प्रवेशाचा अापला दावाही मजबूत केला. शानदार कमबॅक करताना मुंबई संघाने घरच्या मैदानावर रविवारी दाेन वेळच्या किताब विजेत्या काेलकाता नाइट रायडर्सचा पराभव केला. राेहितच्या नेतृत्वात मुंबईने १३ धावांनी सामना जिंकला. मुंबईचा लीगमधील हा चाैथा विजय ठरला. दुसरीकडे दिनेश कार्तिकच्या काेलकाता संघाचा लीगमधील हा पाचवा पराभव ठरला. 


सूर्यकुमार यादवच्या (५९) शानदार अर्धशतकाच्या बळावर मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना घरच्या मैदानावर काेलकात्यासमाेर विजयासाठी १८२ धावांचे खडतर लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात काेलकाता संघाला ६ गड्यांच्या माेबदल्यात अवघ्या १६८ धावांपर्यंत मजल मारता अाली. काेलकाता संघाचा विजयासाठीचा प्रयत्न अपुरा ठरला. संघाच्या विजयासाठी राॅबिन उथप्पाने (५४) अर्धशतकी खेळी केली. मात्र, इतर फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे काेलकात्याला पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार दिनेश कार्तिकने नाबाद ३६ धावांची खेळी केली.  टीमकडून नितीश राणाने ३१  अाणि सलामीवीर लीनने १७ धावांचे याेगदान दिले. मुंबईकडून हार्दिकने दाेन विकेट घेतल्या. तसेच मॅक्लिनघन, बुमराह, कृणाल अाणि मयंक मारकंडेने प्रत्येकी १ विकेट घेतली. 

 

सामनावीर हार्दिकची अष्टपैलू कामगिरी 
मुंबईच्या विजयात हार्दिकने माेलाचे याेगदान दिले. त्याने अष्टपैलू कामगिरी करताना फलंदाजीत नाबाद ३५ अाणि गाेलंदाजीमध्ये दाेन विकेट घेतल्या. त्याने २० चेंडूंत चार चाैकार अाणि एका षटकाराच्या अाधारे ३५ धावांची खेळी केली.  याच चमकदार कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गाैरवण्यात अाले.

 

सूर्यकुमारचे सलग तिसरे अर्धशतक
मुंबईचा युवा फलंदाज सूर्यकुमार यादवने अापला तुफानी खेळीचा फाॅर्म कायम ठेवताना सलग तिसऱ्या अर्धशतकाची नाेंद केली. त्याचे लीगमधील हे चाैथे अर्धशतक ठरले. त्याने ३९ चेंडूंचा सामना करताना ७ चाैकार अाणि २ षटकारांच्या अाधारे ५९ धावांची खेळी केली.

 

पुढील स्लाईडवर पहा, सामन्याचे धावफलक...... 

 

बातम्या आणखी आहेत...