आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षाचा सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून अश्विनची निवड, आता नव्या ट्रिकसह खेळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताचा ऑफस्पिनर आर. अश्विनची सिएट क्रिकेट रेटिंगमध्ये (सीसीआय) वर्षाचा सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून निवड झाली. क्रिकेट क्लब ऑफ इंडियात झालेल्या कार्यक्रमात भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी त्याला सन्मानित केले.
 
पुरस्कार मिळाल्यानंतर अश्विन म्हणाला, ‘मी दोन महिने तयारी केली आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत नव्या ट्रिकसह मैदानावर उतरणार. वनडेत नियम बदलले आहेत. यामुळे जुण्या रणनितीने खेळता येणार नाही. आम्हाला अाक्रमणाची पद्धत बदलावी लागेल. ’ या वेळी शुभम गिलला सर्वश्रेष्ठ युवा खेळाडूचा पुरस्कार मिळाला. मुुंबईत इंग्लंडविरुद्ध अंडर-१९ वनडे मालिकेत चांगले प्रदर्शन केल्याने त्याला हा पुरस्कार मिळाला.  
 
नव्या नियमाने नवे विचार करायला भाग पाडले
‘मी दोन महिने ताजेतवाणे होऊन परतलो आहे. या काळात मी माझ्या गोलंदाजीत नवे तंत्र आणले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत मी आपल्या भात्यात नवे बाण घेऊन उतरेल. माझी विविधता किती उपयुक्त ठरते, यावर माझ्या नव्या युक्तीचे यशापयश अवलंबून असेल. ३० फुटांच्या आत ४ क्षेत्ररक्षक आणि दोन्ही टोकांनी दोन नव्या चेंडूंनी गोलंदाजांना नवे काही करण्यास भाग पाडले आहे’, असे अश्विन यावेळी म्हणाला.

गोलंदाजीत वाइड यॉर्कर, नकल बॉलचा होतोय उपयोग
वाइड यॉर्कर: डेथ ओव्हरमध्ये धावा रोखण्यासाठी याचा उपयोग होतो. यात चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकला जातो. हा चेंडू फलंदाजांपासून थोडा दूर असतो.
नकल बॉल: बोटावर खूप जोर द्यावा लागतो. सीमजवळ दोन बोटे मोडलेली असतात. या बोटाला फलंदाज बघू शकत नाही आणि गोलंदाज या मदतीने फलंदाजांना चकवतात. ही गोलंदाजीची नवी पद्धत आहे.
बातम्या आणखी आहेत...